• Download App
    Supriya Sule सुप्रिया सुळे, रोहित पवार एकदम "हायपर लोकल" का झाले??; त्यांच्या "राष्ट्रीय" राजकारणाला कुणी सुरुंग लावले??

    Supriya Sule : सुप्रिया सुळे, रोहित पवार एकदम “हायपर लोकल” का झाले??; त्यांच्या “राष्ट्रीय” राजकारणाला कुणी सुरुंग लावले??

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule  आणि त्याच पक्षाचे आमदार रोहित पवार हे “राष्ट्रीय” आणि “राज्यीय” राजकारण सोडून एकदम “हायपर लोकल” का झाले??, असा सवाल त्यांच्या राजकीय कृतीतून समोर आला. Supriya Sule

    सुप्रिया सुळे एकदम “लोकल” मधल्या “लोकल” प्रश्नावर आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या. वर्क ऑर्डर निघेपर्यंत मी इथून हलणार नाही आणि काही खाणारही नाही, अशी घोषणाच सुप्रिया सुळे यांनी उपोषण स्थळावरून केली, तर दुसरीकडे रोहित पवारांनी राम शिंदे यांच्यावर कर्जत जामखेड पालिकेच्या मुद्द्यावरून टीका केली.

    एरवी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे शरद पवारांचे दोन निष्ठावंत नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देश कसा चालवायचा??, देश कसा सुधारायचा??, देशाची कायदा आणि सुव्यवस्था टिकवून अर्थव्यवस्था कशी वाढवायची??, याचा उपदेश करणारी भाषणे किंवा सोशल मीडिया पोस्टी करत असतात. अधून मधून हे दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्याचबरोबर चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे वगैरे मंत्र्यांना राज्य कसे चालवावे??, राज्याचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय पण कसे असावे??, याविषयी उपदेशात्मक टीका टिप्पणी करत असतात.



    पण आज अचानक असे काय घडले??, की त्यामुळे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार “हायपर लोकल” झाले आणि त्यांनी चक्क स्थानिकातल्या “स्थानिक” मुद्द्यांवर काही ना काहीतरी भाष्य केले!!

    भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानाच्या जवळ असलेल्या रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळेंनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. बनेश्वर देवस्थान ते वनविभागाची कमान हा ७५० मीटरचा रस्ता काँक्रीटचा करावा, यासाठी सुप्रिया सुळे यांनी अनेक वर्षे पाठपुरावा केला, पण तो रस्ता काही काँक्रीटचा झाला नाही. वास्तविक शरद पवारांनी सगळ्या महाराष्ट्राचा विकास केला असताना नेमका तोच रस्ता त्यांच्या नजरेतून कसा सुटला??, हा खरं म्हणजे सवाल सुप्रिया सुळे यांनी करायला हवा होता, पण त्यांनी तो सवाल केला नाही. त्या फडणवीस सरकारच्या विरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या. संबंधित रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर निघेपर्यंत इथून हलणार नाही आणि काही खाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. पण पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मात्र त्यांनी ट्रम्प प्रशासनाने भारतावर लादलेले टेरिफ आणि जागतिक आणि राष्ट्रीय अन्य प्रश्नांना देखील उत्तरे दिली. पण उपोषण मात्र त्यांनी “हायपर लोकल” मुद्द्यावर केले.

    रोहित पवारांनी देखील कर्जत जामखेड पालिकेतली सत्ता हातातून निसटायची भीती निर्माण झाल्यानंतर अचानक “हायपर लोकल” होऊन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर टीका केली. रोहित पवार समर्थक असलेल्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरुद्ध बंडखोरी झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या आठ नगरसेवकांनी आणि बाकीच्या काही नगरसेवकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला. त्यामुळे रोहित पवारांनी चिडून राम शिंदे यांच्यावर टीका केली. नगरसेवक फोडाफोडी मागे कोण आहे, हे लक्षात आले, असे रोहित पवारांनी राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर टीकास्त्र सोडले. राम शिंदे यांनी विधान परिषदेच्या सभापती पदाचा मान राखावा. कर्जत जामखेड नगरपालिकेचा सन्मान राखावा, असा उपदेश त्यांनी केला.

    एरवी हेच रोहित पवार देशाच्या पंतप्रधानांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत राज्य कसे चालवावे, याचा उपदेश करणारी भाषणे आणि सोशल मीडिया पोस्टी करतात. पण आज कर्जत जामखेड पालिकेची सत्ता हातातून निसटायला लागल्यानंतर मात्र त्यांनी “हायपर लोकल” होऊन राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

    पण या सगळ्याचा अर्थ, 2024 च्या निवडणुकीमध्ये कसे बसे निसटून निवडून आलो, पण आता “हायपर लोकल” झालो नाही, तर 2029 च्या निवडणुकांमध्ये आपले काही खरे नाही, ही भीती तर सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या मनात दडून बसलेली नसेल ना??

    Supriya Sule and Rohit Pawar climbes down to hyper local politics

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस