• Download App
    Sharad pawar गुरुने दिला शरणागतीचा वसा; चला पुतण्याच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसा!!

    Sharad Pawar : गुरुने दिला शरणागतीचा वसा; चला पुतण्याच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसा!!

    नाशिक : गुरुने दिला शरणागतीचा वसा; चला पुतण्याच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसा!!, अशी अवस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची लवकरच होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस ऐवजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिला. त्यामुळे आपल्याला पुढची 5 वर्षे विरोधात बसावे लागेल. सबब आपणच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे निघून चालले जाऊ, असा आग्रह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार आणि खासदारांनी धरला आहे.

    यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये 8 आणि 9 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये अजित पवारांच्या मार्गाने भाजपच्या सत्तेपुढे शरणागती पत्करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

    सत्तेपुढे शरणागती पत्करण्याचा वसा शरद पवारांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांनीच पवारांना दिला. स्वतः यशवंतरावांनी 1980 मध्ये सुरुवातीला स्वाभिमान दाखवून स्वतंत्रपणे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवल्या होत्या, पण इंदिरा गांधींच्या काँग्रेसपुढे हरल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधीपुढेच शरणागती पत्करली होती. जनतेने कौल देऊन इंदिरा गांधींची काँग्रेस खरी ठरवली आहे. त्यामुळे आपण काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात जात आहोत, असे सांगून यशवंतरावने त्यावेळी आपल्या शरणागतीला वैचारिक मुलामा चढाविला होता.


    Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट


    शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांनी यशवंतरावांचीच “री” ओढत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनतेने कौल दिल्याचा दाखला देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असा प्रस्ताव दिल्याची बातमी समोर आली आहे.

    लोकसभेत पवारांचे 9 खासदार आहेत, तर विधानसभेत 10 आमदार आहेत. हे सगळेजण अजित पवारांच्या सत्तेच्या वळचणीला जायला उत्सुक आहेत. फक्त जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील आणि उत्तम जानकर या 3 आमदारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुढे शरणागती पत्करायला विरोध असल्याचे सांगितले जात आहे, पण कर्जत जामखेड म्हणून निसटता विजय झाल्यानंतर रोहित पवारांचा अजितदारांपुढे शरणागती पत्करण्याचा आग्रह सुरू झाला आहे.

    आता खासदार सुप्रिया सुळे यांना राजी केले की अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा होईल. मात्र, या परिस्थितीत बहुमतापुढे मान तुकवून स्वतः शरद पवार संघटनेपासून बाजूला होतील असे सांगण्यात येत आहे. भाजपा बरोबर जाणे इष्ट नाही, अशी “वैचारिक” भूमिका घेऊन ते विरोधकांच्या आघाडीत राहण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. परंतु पवारांचा निवृत्तीचा आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता, ते संघटनेपासून बाजूला होऊन नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना “मोकळेपणाने” सत्तेच्या वळचणीला जाऊ देतील, ही शक्यता फार कमी आहे. हा सगळा राजकीय खटाटोप ते छुप्या मार्गानेच “डाव” टाकत करण्याची दाट शक्यता आहे.

    बाकी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या रक्ताला वाव, तालुका, जिल्हा, शहर पातळीवर संघटनात्मक बदल वगैरे किरकोळ बातम्या माध्यमांनी चर्चेत ठेवल्या आहेत.

    Sharad pawar may surrender to the power of his nephew ajit pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस