• Download App
    Sharad pawar पवारांच्या घरात मुख्यमंत्री पद येण्याच्या नुसत्याच गप्पा; प्रत्यक्षात दिल्लीच्याच हातात सगळ्या नाड्या!!

    Sharad Pawar : पवारांच्या घरात मुख्यमंत्री पद येण्याच्या नुसत्याच गप्पा; प्रत्यक्षात दिल्लीच्याच हातात सगळ्या नाड्या!!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी महाविकास आघाडीला 85 च्या खोड्यात अडकवून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना “डबल डिजिट” वठणीवर आणले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात पवारच खऱ्या अर्थाने यशस्वी झाले, अशी मखलाशी मराठी माध्यमांनी चालवली आहे. Sharad pawar

    उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या वादामध्ये शरद पवारांनी कसा “डाव” टाकला, कशी “चाणक्य खेळी” केली, दोन्ही पक्षांना 85 जागांच्या फॉर्म्युलावर कबुली द्यायला कसे भाग पाडले, याची बहारदार वर्णनाने मराठी माध्यमांनी केली आणि त्यातून पवारांच्या घरामध्ये 30 वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदी येणार का??, असे नॅरेटिव्हचे पिल्लू सोडले. मूळात पवारांनी 85 चा फॉर्म्युला मुख्यमंत्रीपदावरचा इतरांचा दावा ढिल्ला करण्यासाठीच काढल्याचा मराठी माध्यमांनी दावा करून पवारांची भलामण चालवली. Sharad pawar

    पण प्रत्यक्षात पवारांचा राजकीय इतिहास आणि वर्तमान पाहता पवारांनी कितीही “चाणक्य खेळ्या” केल्या आणि कितीही “डाव” टाकले, तरी ते निर्णायक पातळीवर काँग्रेस किंवा शिवसेनेवर मात करू शकले का?? हे जर तपासून पाहिले, तर त्यांच्या चाणक्य खेळीतून किंवा डाव टाकण्यांमधून ते स्वतःचे राजकारण तरंगत ठेवण्यापलीकडे दुसरे काही करू शकले नाहीत, ही मराठी माध्यमांना दारूण वाटणारी वस्तुस्थिती समोर येते.

    पवार कधीही स्वतःच्या मनातला मुख्यमंत्री खुर्चीवर बसवू शकले नाहीत. याला अपवाद फक्त सुधाकरराव नाईकांचा होता. त्यानंतर पवारांनी फक्त आपल्या मनात नसलेला मुख्यमंत्री शक्यतो गादीवर नको, एवढ्याच खेळ्या मर्यादितपणे यशस्वीरित्या खेळू शकले. अशोक चव्हाण नकोत, पृथ्वीराज चव्हाण नकोत, नंतर नाना पटोले नकोत, भाजपमधून देवेंद्र फडणवीस नकोत, हीच पवारांची भूमिकेतली नकारात्मक सलगता राहिली, पण ज्यांच्या नावाने पवार आणि त्यांची कन्या स्तुतीसुमनांचे पूल बांधतात, त्या नितीन गडकरींना भाजपने कधी मुख्यमंत्री केले नाही. त्याचबरोबर केवळ पवारांना नकोत म्हणून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायचे राहिले नाहीत. त्यामुळे पवारांना गेल्या 15 वर्षांमध्ये तरी मनात नको असलेले मुख्यमंत्री सहन करावे लागलेत. त्यामध्ये पवारांच्या कुठल्याही “चाणक्य खेळ्या” किंवा “डाव” फारसे यशस्वी झाले नाहीत.

    पवारांचे राजकारण हे त्यांच्या 50 – 60 आमदारांच्या निवडून आणण्याच्या क्षमतेवर कायम तरंगत राहिले. त्यापलीकडे माध्यम निर्मित प्रतिमा जपणे आणि आपली जुनी प्रकरणे शक्यतो आपल्या अंगावर शेकू नयेत यासाठी दिल्लीत दोन्ही बाजूंनी लॉबिंन करणे याखेरीस त्यात फारसे यश आल्याचे दिसले नाही.

    महाराष्ट्राचा अस्मिताच्या अस्मितेच्या गप्पा महाराष्ट्रात आणि त्यातील मराठी माध्यमांमध्ये मारणे निराळे आणि प्रत्यक्ष राजकारणामध्ये दिल्लीतल्या नेत्यांवर मात करून यशस्वी होणे निराळे. ते महाराष्ट्रातल्या दोन्ही बाजूंच्या नेत्यांना कधी जमले नाही. त्यात शरद पवार बिलकुल अपवाद नाहीत. उलट शरद पवार दिल्लीतल्या नेत्यांसमोर सातत्याने हरले. दिल्लीत मात खाल्ली म्हणून महाराष्ट्रात परत आले.

    आता त्या पवारांना आपल्या घरात 30 वर्षांनंतर मुख्यमंत्री पद आणायचे असेल, तर ते स्वतःच्या पक्षाच्या बळावर बहुमत मिळवून आणता येईल का??, स्वतःच्या मुलीच्या राजकीय कर्तृत्वावर तरी आणता येईल का?? स्वतः निर्माण केलेल्या आघाडीच्या बळावर तरी मुख्यमंत्री पद पवारांच्या घरात चालत येईल का??, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत. Sharad pawar

    – सोनियांच्या दरबारी पवारांची किंमत किती?? 

    कारण काँग्रेस किंवा शिवसेनेचा डिजिट घसरवून पवार स्वतःचा डिजिट वाढवू शकलेले नाहीत. ते डबल डिजिटमध्येच निवडणूक लढवून आमदार निवडून आणणार आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात असलेले किंवा मनात नसलेले घरातले मुख्यमंत्रीपद हे सरळ – सरळ दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांच्या मनात काय आहे??, त्यावर अवलंबून असणार आहे. शिवाय हा निर्णय राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे हे घेणार नसून तो सोनिया गांधींच्या दरबारात घेतला जाणार आहे. आता सोनियांच्या दरबारात पवारांची “राजकीय किंमत” किती उरली आहे?? हे सांगायला वेगळ्या संशोधनाची गरज नाही. तिथे ठाकरेंचा “डायरेक्ट एक्सेस” निर्माण झाला आहे.

    Sharad pawar can’t make chief minister of his own choice without concent of Sonia Gandhi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस