• Download App
    Sharad Pawar ही कसली जखमी वाघाची लढाई??,... ही फार तर...!!

    Sharad Pawar : ही कसली जखमी वाघाची लढाई??,… ही फार तर…!!

    Sharad Pawar ही कसली जखमी वाघाची लढाई??… ही फार तर एखाद्या लबाड प्राण्याची लढाई असे म्हणावे लागेल!! कारण प्रख्यात पत्रकार प्रभू चावलांनी लोकमत मध्ये लिहिलेल्या लेखानुसार शरद पवार सध्या एका जखमी वाघाची लढाई खेळत आहेत. किंबहुना त्यांना ती खेळावी लागत आहे. Sharad Pawar

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवारांच्या राजकारणाचा आढावा घेणारा लेख प्रभू चावलांनी लिहिला आहे. त्यात त्यांनी ही जखमी वाघाची लढाई असल्याचे नमूद केले आहे. प्रभू चावलांच्या लेखनाविषयी किंवा त्यांच्या राजकीय रिपोर्टिंगच्या अनुभवाविषयी शंका घेण्याचे कारण नाही. कारण त्यांचा अनुभव आणि आकलन निश्चितच मोठे आहे, पण म्हणून त्यांचे सगळे राजकीय आकलन जसेच्या तसे खरे मानायचे देखील कारण नाही. त्यांनी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या राजकारणाचे महिमा मंडन करताना त्यांना वाघाचे परिमाण लावणे किंवा उपमा देणे हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण म्हणून ते परिमाण अथवा ती उपमा शरद पवारांसाठी योग्यच आहे असेही समजायचे कारण नाही. Sharad Pawar


    Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल- उद्धव ठाकरेंनी मतांसाठी लाचारी पत्करली, आम्ही हार पत्करू, पण लाचारी नाही


    वास्तविक महाराष्ट्राच्या राजकारणात वाघाचे परिमाण, प्रतिमा अथवा उपमा ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी द्यायचा प्रघात होता. कारण स्वतः बाळासाहेबांनीच शिवसेनेचा वाघ ही प्रतिमा निर्मिती केली होती. बाळासाहेबांचे मराठी माणसाचे आणि हिंदुत्वाचे सगळे राजकारण कोणाला पटो अथवा न पटो, ते “समोरून” होते. उघड होते. बाळासाहेब “समोरून” वार करायचे. “समोरून” विरोधकांचे वाभाडे काढायचे. त्यात सभ्य-असभ्यतेचा किंवा साधनशूचितेचा कुठलाही बाऊ बाळगायचे नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकारणाविषयी किंवा राजकारण शैली विषयी मतभेद असू शकतील, पण बाळासाहेब “समोरून” वार करायचे ही मात्र वस्तुस्थिती त्यामुळे बदलत नाही. Sharad Pawar

    त्याउलट पवारांचे राजकारण हे कायम “मागून” लपून-छपून किंवा पूर्वेकडे बोट दाखवून पश्चिमेकडे जाणारे, “कात्रजचा घाट” या शब्दांनी समर्थकांनी महिमा मंडन केलेले राहिले. वसंतदादांचे सरकार पाडून पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर पवारांवर पाठीत खंजीर खुपसणारे नेते हा आरोप कायमचा चिकटला. याचा नेमका अर्थ असाच की पवारांनी कधी “समोरून” राजकारण केले नाही. त्यांनी कायम विरोधी पक्षांचे किंवा अगदी ते ज्या गोटा मध्ये असतील, त्या गोटातल्या मित्र पक्षाचे नेते फोडून राजकीय लचके तोडले. हे काही वाघाचे लक्षण नव्हे, तर ते फार तर लबाड लांडग्याचे लक्षण म्हणता येईल.

    कारण वाघ हा स्वतंत्रपणे एकटा कुठलीही शिकार करून खाणारा प्राणी आहे. पण तसे लबाड प्राण्याबाबत म्हणता येईलच, याची कुठलीही खात्री देता नाही. त्यामुळे प्रभू चावला यांनी जरी अगदी पवारांचे वर्णन जखमी वाघ असे केले असले, तरी ते फार तर त्यांचा पक्ष हातातून गेला किंवा चिन्ह काढून घेतले गेले एवढ्या पुरतेच मर्यादित अर्थाने योग्य मानता येईल. त्या पलीकडे नाही. कारण अशा स्वरूपाची फोडाफोडी हा तर पवारांच्या राजकारणाचा मूलभूत गाभाच राहिला आहे. त्यांनी काँग्रेस आणि शिवसेना फोडूनच आपला पक्ष वाढविला. म्हणूनच आता त्यांचा पक्ष फुटल्यामुळे त्यांना जखमी वाघ की लबाड प्राणी म्हणायचे हे ज्याचे त्याने ठरवावे लागेल!!

    Prabhu chawla claims Sharad Pawar is fighting tiger’s fate, but…

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा