• Download App
    पुण्यात राजकीय पेटवापेटवी : मनसेच्या हनुमान चालीसाला राष्ट्रवादीचे हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे प्रत्युत्तर!! । Political firestorm in Pune: NCP's Iftar party responds to MNS's Hanuman Chalisa at Hanuman Temple !!

    पुण्यात राजकीय पेटवापेटवी : मनसेच्या हनुमान चालीसाला राष्ट्रवादीचे हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे प्रत्युत्तर!!

    मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या मेळाव्यात मशिदींवरचे भोंगे उतरवण्याचा विषय काढून ठाकरे – पवार सरकारला चांगलेच डिवचल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातही शरद पवारांच्या पक्षाने हा विषय फारच मनाला लावून घेऊन आपल्याला आयते कोलीत हातात मिळाल्याचे दाखवून दिले आहे. Political firestorm in Pune: NCP’s Iftar party responds to MNS’s Hanuman Chalisa at Hanuman Temple !!

    मनसेने पुण्यात कुमठेकर रस्त्यावर खालकर तालीम मारुती मंदिरात उद्या हनुमान जयंतीला राज ठाकरे यांच्या हस्ते हनुमान चालीसा आरती महाआरती ठेवली आहे. आता त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस साखळीपीर तालीम संघात हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी करून प्रत्युत्तर देणार आहे.

    मनसे आणि राष्ट्रवादी यांच्या राजकीय भांडणात पुण्यात सामाजिक पेटवापेटवी करण्याचा कार्यक्रम यातून दिसून येत आहे. त्यात मराठी माध्यमांनी “राष्ट्रवादीचे मनसेला जशास तसे उत्तर” वगैरे भाषा वापरून या पेटवापेटवीच्या आगीत तेल ओतण्याचे काम सुरू केले आहे. मनसेच्या हनुमान चालीसा महाआरतीची तयारी कशी सुरू आहे? त्यासाठी कसे नियोजन करण्यात येत आहे? याच्या बातम्या तेल, मीठ, मसाला लावून दिल्या आहेत. आता हे कमी पडले म्हणून की काय राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्युत्तराची बातमी आहे तशीच मी तेल, मीठ, मसाला लावून मराठी माध्यमे देत आहेत. तुम्ही खालकर तालीम हनुमान मंदिरात हनुमान चालीसा महाआरती करणार म्हणून आम्ही साखळीपीर तालमीत हनुमान मंदिरात एक इफ्तार पार्टी देणार असला उफराटा न्याय राष्ट्रवादी काँग्रेसने लावला आहे.



    या सर्व प्रकारातून पुण्यात नुसती राजकीय पेटवापेटवी होईल की त्या पलिकडे जाऊन सामाजिक पेटवापेटवीचा “करेक्ट कार्यक्रम” राष्ट्रवादी काँग्रेसला करून घ्यायचा आहे??, असा सवाल आता सर्वसामान्य पुणेकर विचारत असल्यास तो अजिबात गैर मानता येणार नाही.

    हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी आयोजित करण्याचा राष्ट्रवादीच्या मनसूब्याचा भाजपने निषेध केला आहे. पुण्यातले सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे धोरण दिसते. ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. मनसेच्या हनुमान चालीसा महाआरतीला विरोध समजू शकतो. परंतु त्याला प्रत्युत्तर देताना थेट हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी करणे हे कोणत्या सामाजिक न्यायाच्या किंवा सामाजिक सौहार्दाच्या भूमिकेत बसते??, हा सवाल सर्वसामान्य पुणेकर विचारत असतील तर तो गैर मानता येणार नाही.

    खालकर तालमीत मनसेचे राजकीय वर्चस्व आहे, तर साखळीपीर तालमीत राष्ट्रवादीला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे वर्चस्व आहे. म्हणून हे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपल्याला वाट्टेल तसे वागणार असतील तर त्याला कायद्याचा पायबंद घालण्यात आवश्यक आहे. पण तू पायबंद एकतर्फी असता कामा नये. तो सही करण्याचे कारण नाही. त्याचबरोबर समोरच्याने महाआरती केली म्हणून आपण मंदिरात इफ्तार पार्टी करायची हा राजकीय विकृतीचा कळस आहे. एरवी धर्मनिरपेक्ष आणि जातीय सलोखा वाढविण्याचा टेंभा मिरवणाऱ्या पक्षाने स्वतःच समाजस्वास्थ्य बिघडवून त्याच्या आगीत तेल ओतणे हाच प्रकार यातून दिसून येतो आहे.

    Political firestorm in Pune: NCP’s Iftar party responds to MNS’s Hanuman Chalisa at Hanuman Temple !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!