• Download App
    सिध्दूंच्या गळ्यात "सल्ल्यांचे हार"; पण पंजाबसाठी ते दहशतवादाचे फास...!!|Navjyot singh siddhu is playing with fire in punjab while politically fighting with capt Amarinder Singh

    सिध्दूंच्या गळ्यात “सल्ल्यांचे हार”; पण पंजाबसाठी ते दहशतवादाचे फास…!!

    पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिध्दू यांच्या राजकीय सल्लागारांचे उटपटांग “सल्ले” सिद्धूंच्या गळ्यात काय अडकायचे ते अडकोत, पण ते पंजाबच्या गळ्यात दहशतवादाचा फास बनून रूतायला नकोत…!!Navjyot singh siddhu is playing with fire in punjab while politically fighting with capt Amarinder Singh


    पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू हे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याशी “राजकीय उंदीर मांजरा”चा खेळ खेळत असताना प्रत्यक्षात मात्र राज्यात लोकांच्या जीवनाशी खेळ करतात की काय…??, असे वाटायला लागले आहे.

    त्यांनी स्वतःहून नेमलेले सल्लागार जेव्हा त्यांच्या गळ्यात वेगवेगळ्या सल्ल्यांच्या रूपाने फुटीरतावावादाची माळ घालतात ना, तेव्हा हा लोकांच्या जीवनाशी खेळ नाही तर दुसरे काय म्हणायचे…?? हा प्रश्न पडतो.



    नवज्योत सिध्दू यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात तथाकथित राजकीय लढा उभारून काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून पंजाब प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात घालून घेतली. परंतु त्यानंतर त्यांनीच नेमलेले दोन सल्लागार ज्या पद्धतीने “राजकीय सल्ल्यांची” मुक्ताफळे उधळत आहेत ना, ते पाहिले तर त्यातले राजकीय आणि राष्ट्रीय हितासंदर्भातले गांभीर्य लक्षात येते. सिद्धूंचे मालविंदरसिंग माली यांनी, “काश्मीर हा भारताचा भाग नाही. तो भारत आणि पाकिस्तान यांनी बळजबरीने बळकावला आहे,”

    अशी मुक्ताफळे उधळली. त्यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाचाही हवाला दिला. मालविंदरसिंग एवढेच करून थांबलेले नाहीत. त्यांनी जूनमध्ये इंदिरा गांधींचे एक पोस्टरही सोशल मीडिया वरून शेअर केले होते. त्यामध्ये त्यांनी इंदिरा गांधी हे या मानवी कवट्यांच्या जवळ उभ्या आहेत, असे दाखविले होते. मालविंदर सिंग यांच्या या राजकीय करामतीवरून कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी सिद्धू ना झापले. काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी देखील त्यांना कानपिचक्या दिल्या.

    त्यानंतर नवज्योत सिंग सिध्दू यांना जाग आली आणि त्यांनी मालविंदसिंग माली आणि आपले दुसरे सल्लागार प्यारेलाल गर्ग यांना बोलवून घेतले. त्यांच्याशी काही चर्चा केली. थोडक्यात त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

    परंतु मुळात हा प्रश्न पडतो की या सगळ्या गोष्टीतून नवज्योत सिंग सिध्दू काय साध्य करू इच्छित आहेत…?? सिध्दू यांचे कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे काय राजकीय भांडण असायचे ते असो… पंजाबच्या निवडणुकांचा निकाल काय लागायचा तो लागो… परंतु, नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांचे दोन सल्लागार ज्या आगीशी खेळत आहेत ती आग कुठपर्यंत भडकू शकते…??, याची त्यांना जाणीव तरी आहे काय…?? पंजाब दोन दशके दहशतवादाच्या आगीत होरपळत होता.

    काश्मीर आजही दहशतवादाच्या आगीत होरपळतो आहे. अशावेळी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी राहून नवज्योत सिंग सिध्दू यांना ही दहशतवादाची आग पंजाबमध्ये पुन्हा सुलगवायची आहे काय…?? सिध्दू यांना आपल्या दोन सल्लागारांच्या मुक्ता फळांचा गंभीर राजकीय अर्थ समजतो काय…??

    सिध्दू यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमून काँग्रेस श्रेष्ठींनी चूक केली आहे काय??, सिद्धू यांच्या एकूण राजकीय कर्तृत्वाचा आढावा घेतला तर ही चूकच आहे असेच म्हणावे लागेल. स्वतः सिद्धूंचे राजकीय कर्तृत्व त्यांच्या राजकीय सल्लागारांपेक्षा वेगळे नाही. पाकिस्तानात इम्रान खान यांची राजवट आल्यानंतर यांना जाऊन भेटणे, पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेणे यातून नवज्योत सिंग सिध्दू यांची राजकीय प्रगल्भतेची पातळी लक्षात येते.

    खरे म्हणजे “राजकीय प्रगल्भता” हे शब्दच त्यांना लागू होत नाहीत. त्याऐवजी “राजकीय लायकी” हे शब्द वापरले पाहिजेत, अशा राजकीय लायकीच्या माणसाला काँग्रेसश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्षपदी नेमून नेमके काय मिळवले आहे आणि सहा – आठ महिन्यांमध्ये पंजाबमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस काय मिळवणार आहे…??, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. अकाली दलाने आपल्या तोफा आणि बंदुका कॅप्टन अमरिंदरसिंगांवर चालवल्या होत्या. पण आता त्या नवज्योत सिध्दूंकडे वळविल्या आहेत. यातच पंजाब काँग्रेसच्या राजकीय भवितव्याची बीजे दिसत आहेत. निवडणूक निकालांच्या रूपाने झाड उगवलेले दिसेल, पण ते वठलेले असेल…!!

    Navjyot singh siddhu is playing with fire in punjab while politically fighting with capt Amarinder Singh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!