• Download App
    विज्ञानाची डेस्टिनेशन्स : कॅलिफोर्ऩियातील कलिंगड्यासारख्या लालभडक बर्फाचे रहस्य Mystery of the reddish snow like watermelon in California

    विज्ञानाची डेस्टिनेशन्स : कॅलिफोर्ऩियातील कलिंगड्यासारख्या लालभडक बर्फाचे रहस्य

    समजा तुम्ही दहा ते बारा हजार फूट उंच पर्वताराजीवर भर्फातून चालत आहात आणि अचानक तुमच्या पायाचे ठसे चक्क लाल किंवा गुलाबी उमटू लागले तर तुम्ही अक्षरशः हादरुनच जाल. मात्र याची प्रचिती तुम्हाला अमेरिकेतील कॅलिफोर्ऩिया प्रांतातील सिइरा नेवदा या भागातील पर्वतरांगात उन्हाळ्यात नेहमी येते. Mystery of the reddish snow like watermelon in California

    येथील हिमाच्छादीत पर्वतरांगा नेहमीसाऱख्याच शुभ्र दिसतात. मात्र जवळून पाहिल्यास तर हा बर्फ लालसर झालेला असतो. एखाद्या कलिंगड्यासारखा रंग त्याला प्राप्त होतो. त्यामुळे त्याचे नावदेखील वॉटरमेलन स्नो असे ठेवले आहे. हिवाळ्यात येथे हिमवृष्टी होते. मात्र जगात सर्वत्र पांढराशुभ्र दिसणारा बर्फ येथे मात्र कधी कधी लालसर दिसतो. त्यामुळे गिर्यारोहदेखील बुचकाऴ्यात पडतात.

    महान तत्ववेत्ता अरिस्टॉटलही या बर्फाच्या प्रेमात पडला होता. त्यांनी यावर लेखनदेखील केले आहे. पुढे पुढे जसजसे विज्ञान प्रगत होत चालले तसा यामागच्या शास्त्रीय कारणांचा वेध घेण्याचे काम सुरु झाले. सुरुवातीला काही जण म्हणत की येथे असलेल्या खडकांचा किंवा जमिनीखाली असलेल्या खनिजांमुळे बर्फाला असा प्रकारचा रंग येत असेल. मात्र नक्की कारण कोणालाच सांगता येत नसे. त्यामुळे यामागची उत्कंठा वाढू लागली. इतकी की 1818 मध्ये प्रसिद्ध दर्यावर्दी कॅप्टन रॅस आर्टिक खंडाच्या अभ्यासासाठी चार जहाजांसह निघाला होता.

    वाटेत त्याला हा बर्फ दिसला. त्याने तो बर्फ अभ्यासासाठी इंग्लंडला नेला मात्र तोपर्यंत त्याचे पाणी झाले होते. आणि एखाद्या रेड वाईनप्रमाणे तो द्रव दिसत होता. मात्र त्यानंतर 19 व्या शतकात यामागचे नेमके कारण कळले व सर्वाचा जीव भांड्यात पडला. बर्फाला हा रंग तेथेली अल्गीमुळे येत असल्याचे स्पष्ट झाले. या स्नो अल्गी खऱ्या तर हिरव्या रंगाच्या असतात.

    मात्र त्यामध्ये लाल रंगाच्या पेशी किंवा पिगमेंट असतात. यामुळे त्या अल्गीचे सूर्यापासून संरक्षण होते. ज्यावेळी हिवाळा असतो त्यावेळी या अल्गी गोठून जातात. मात्र उन्हाळ्यात या अल्गीवर सूर्यप्रकाश पडला त्यातील रेड पिगमेंट सूर्याची उष्णता शोषूऩ घेतात. बाजूचा बर्फ वितळल्याने या लाल पिगमेट पृष्ठभागावर येतात आणि बर्फ तसाच म्हणजे लालसर गुलाबी दिसू लागतो. हा बर्फाचा थर साधारणपणे 25 सेटींमीटर खालीपर्यंत राहतो. त्यामुळे येथे काही भागात कलिंगड्यासारख्या बर्फ दिसतो.

    Mystery of the reddish snow like watermelon in California

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!