• Download App
    Media हरियाणातील काँग्रेसच्या विजयाचे "भाकित" फसल्यानंतर माध्यमे लागली भाजपची महाराष्ट्रातली स्ट्रॅटेजी "शोधायला"!!

    Media : हरियाणातील काँग्रेसच्या विजयाचे “भाकित” फसल्यानंतर माध्यमे लागली भाजपची महाराष्ट्रातली स्ट्रॅटेजी “शोधायला”!!

    नाशिक : हरियाणातील काँग्रेसच्या विजयाचे “भाकित” फसल्यानंतर बाकी कुठल्या राजकीय पक्षांपेक्षा माध्यमांनाच भाजपच्या महाराष्ट्रातल्या स्ट्रॅटेजीची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आणि ते आपापल्या “सूत्रांमार्फत” महाराष्ट्रातली भाजपची “शोधायला” बाहेर पडले आहेत. ही “सूत्रे” फार हुशार आहेत. त्यांनी दिलेल्या “निवडक” माहितीच्या आधारे माध्यम प्रतिनिधींनी भाजपच्या स्ट्रॅटेजीचे बरेच “जावईशोध” लावले आहेत. Media predictions failed in haryana, now in search of BJP strategy in maharashtra!!

    हरियाणात प्रत्यक्ष मतमोजणी होईपर्यंत सगळ्याच माध्यमांनी तिथे काँग्रेसचा मोठा विजय आणि भाजपचा मोठा पराभव गृहीतच धरला होता. अनेक नावाजलेले सेफॉलॉजिस्ट आपल्या छातीवर आणि वेगवेगळ्या अवयवांवर हात ठेवून काँग्रेसच्या विजयाची खात्री देऊ थेट आकड्यांचीच मांडणी करत होते. केवळ मतदान होण्याचा आणि त्यानंतर मतमोजणी होण्याचा अवकाश आहे, हरियाणात भाजपच्या सरकारचा पराभव होऊन काँग्रेसचे सरकार विराजमान होणारच आहे, असे ते छातीठोकपणे सांगत होते.

    पण 8 ऑक्टोबरला मतमोजणी झाली आणि सगळेच चित्र उलटे फिरले. 2019 पेक्षा 2024 मध्ये भाजपने जास्त जागा घेऊन हरियाणा तिसऱ्यांदा सत्ता आणली, तेव्हा कुठे भाजप नावाच्या पक्षाकडे कुठली “स्ट्रॅटेजी” असू शकते, ती फलद्रूप होऊ शकते, किंबहुना ती फलद्रूप झाली, याचा “साक्षात्कार” माध्यम-कर्मींना झाला!!


    राधानाथ स्वामी महाराजांचे मुसळधार पावसातही रामतीर्थावर गोदावरी पूजन!!


    तोपर्यंत राहुल गांधींनी हातात राज्यघटनेची प्रत धरून हरियाणा कसा काँग्रेसकडे खेचून घेतला, भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी आपल्या गोटातल्या नेत्यांना उमेदवारी देऊन काँग्रेसवर कसे वर्चस्व ठेवले, शैलजा कुमारी, रणदीप सुरजेवाला आदी नेत्यांना कसे बाजूला ठेवले, तरीही काँग्रेसने तिथे मोठा विजय कसा मिळविला, याचे बहारदार वर्णन एक्झिट पोल पर्यंत सगळीच माध्यमे करत होती. परंतु 8 ऑक्टोबरच्या निकालानंतर या सगळ्या माध्यमांना “बौद्धिक धक्का” बसला. हरियाणातल्या जनमताचा आपल्याला अंदाज कसा आला नाही याने अनेक “उच्चशिक्षित” सेफॉलॉजिस्ट हादरून गेले. 8 ऑक्टोबर पर्यंत भाजपच्या स्ट्रॅटेजीचा कुणीही विचारच केला नव्हता. तिसऱ्यांदा सत्ता आणताना भाजप हरियाणातील पारंपारिक जात वर्चस्वाच्या समीकरणांच्या पलीकडे जाऊन छोट्या समूहांना आणि समुदायांना एकत्र करून हिंदू अजेंडा चालवेल आणि तो यशस्वी होईल, याची साधी भनक देखील शेतकरी आंदोलनाच्या “बौद्धिक” मार्गदर्शकांना लागली नव्हती.

    पण आता मात्र माध्यमांना महाराष्ट्रातल्या भाजपच्या स्ट्रॅटेजी विषयी प्रचंड उत्सुकता किंबहुना “तहान” लागून त्यांनी आपापल्या सूत्रांमार्फत त्याच स्ट्रॅटेजीची “शोध पत्रकारिता” सुरू केली आहे. हरियाणा भाजपने 25 % जाट मतदारांच्या नादी न लागता उरलेल्या 75 % मधील छोट्या-मोठ्या जात समूहांना एकजूट करून मतदानाचा परिणाम फिरवला. तसाच प्रयोग ते महाराष्ट्रात करत आहेत, असा “जावईशोध” माध्यमांनी लावला आहे. त्यासाठी भाजपची केंद्रीय टीम भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव वगैरे कामाला लागले असून ते महाराष्ट्रात मराठेतर छोट्या जातींचे एकत्रीकरण करून मेळावे घेत आहेत. यासाठी भाजपने छोटे जातसमूह आधीच “आयडेंटिफाय” केले आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “सागर” निवासस्थानी बोलवून छोटे मेळावे सुरू आहेत, असे दावे माध्यमांनी चालविले आहेत. यासाठी वेगवेगळ्या आकड्यांची “पेरणी” देखील माध्यमांमधून सुरू आहे. कुणी 168 जात समूहांचा मेळावा झाल्याचे सांगत आहे, तर कुणी तो आकडा 326 पर्यंत खेचून नेला आहे.

    त्याचबरोबर भाजपने नेमक्या कुठल्या मतदारसंघांवर “कॉन्सन्ट्रेट” केले, तो आकडा किती आहे याचीही “पेरणी” वेगवेगळ्या माध्यमांनी चालविली आहे, जणू काही अमित शाह यांनी स्वतः माध्यमांकडे येऊन त्यांच्या कानात माहिती सांगितल्याचा आव हे आकडे “फेकताना” माध्यमांनी आणला आहे. भाजपने म्हणे, पुणे, मुंबई आणि विदर्भातलूया 30 मतदारसंघांवर विशेष कॉन्सन्ट्रेट केले आहे. जणू काही बाकीच्या मतदारसंघांमध्ये भाजपने विजय गृहीत धरला आहे, असा माध्यमांचा खुळचट दावा आहे.

    पण “काँग्रेसी पवार बुद्धी”च्या पलीकडे जाऊन किंबहुना राजकारणाचा जात समूहाच्या पलीकडे जाऊन भाजप विचार करू शकतो आणि तो विचार थेट हिंदू एकजुटीचा असू शकतो, या याविषयी मात्र माध्यम आणि माध्यम करणे चकार शब्द काढायला तयार नाहीत. कारण भारतीय राजकारणाचा फक्त “काँग्रेसी चष्म्यातून” आणि “पवार बुद्धी”च्या चौकटीत अडकूनच विचार करायचा, त्यापलीकडे कुठला “रंग” असू शकतो आणि तो भारतीय समाजमनाशी जात – धर्म याच्यापलीकडे “अपील” करणारा असू शकतो, याची जाणीवच या “उच्चशिक्षित” बौद्धिक राजकीय आणि सामाजिक मार्गदर्शकांना नाही. म्हणून प्रत्यक्ष निकालांपूर्वी भाजपची स्ट्रॅटेजी त्यांना समजत नाही, ही वस्तुस्थिती आहे!!

    Media predictions failed in haryana, now in search of BJP strategy in maharashtra!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!