वृत्तसंस्था
कोलकाता : पोप फ्रान्सिस, इजिप्शियन बडे इमाम अल अजहर अल अहमद तैय्यीब यांच्यात संबंध काय आहे?? हे तिघेही कोणी राष्ट्रप्रमुख आहेत काय??, तर नाही. पण यांच्यात एक common factor आहे, इटलीची राजधानी रोममध्ये ७, ८ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणाऱ्या एका शांतता परिषदेत हे तिघेही नेते सामील होणार आहेत.Mamata Banerjee invited to attend peace conference in Rome, will be attended by pope Francis an Egyptian Imam
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये “अत्यंत महत्त्वाचा विजय” मिळवल्याबद्दल त्यांना या शांतता परिषदेचे खास निमंत्रण पाठविण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये “अत्यंत महत्वाचा विजय” मिळवला आहे. भारतातल्या वंचित, दुर्लक्षित समाजासाठी त्यांचे योगदान अतुलनीय आहे. या कारणासाठी त्यांना सन्माननीय पाहुण्या म्हणून रोममधल्या शांतता परिषदेचे निमंत्रण देण्यात आले आहे.
या परिषदेत पोप फ्रान्सिस, इजिप्तचे बडे इमाम अल अजहर अल अहमद तैय्यबी,जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल आदी नेते उपस्थित राहणार आहेत.ममता बॅनर्जी यांचा खास सन्मान करण्यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा बहुमान करण्याचा या शांतता परिषदेच्या संयोजकांचा विशेष मनसुबा आहे.
ममता बॅनर्जी यांची आंतरराष्ट्रीय मान्यता वाढविण्याचा हा एक प्रयत्न आहे. याआधीच्या शांतता परिषदांमध्ये त्यांना निमंत्रण देण्यात आले नव्हते. परंतु पश्चिम बंगालमध्ये 2000 21 च्या निवडणुकीत त्यांनी मिळवलेल्या विजयाची दखल घेऊन त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
ममतांनी प्रबळ भाजपविरोधात विजय मिळवला. त्या भाजपविरोधी प्रवाहाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची भाजपविरोधी प्रवाहाचे नेतृत्व हाती मिळवण्याची महत्त्वाकांक्षा आहे. या पार्श्वभूमीवर ज्या
परिषदेत पोप फ्रान्सिस आणि इजिप्तचे बडे इमाम हजर राहणार आहेत त्या परिषदेचे निमंत्रण ममता बॅनर्जी यांना देण्यात आले आहे.
यातला राजकीय आणि सामाजिक संदेश आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि भारतातराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचा परिषदेच्या आयोजकांचा उद्देश आहे. भारताच्या राजकीय आणि सामाजिक प्रवाहात हस्तक्षेप करण्याचा हा कौशल्यपूर्वक प्रयत्न आहे.Sant’Egidio community, Catholic association चे अध्यक्ष Macro Impagliazzo यांनी हे निमंत्रण ममता बॅनर्जी यांना पाठविले आहे.
या निमंत्रणाबद्दल ममता बॅनर्जी यांनी स्वतः कोणती प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. परंतुतृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाची तोंडभरून स्तुती केली आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी अधिमान्यता मिळाली आहे याचे वर्णन त्यांनी पुढे येऊन केले आहे.
संपूर्ण जगाचे पश्चिम बंगालकडे लक्ष आहे ममता बॅनर्जी यांनी मानवी मूल्ये राज्यात कशी जोपासली आहेत आणि मानवी मूल्यांचे कसे संवर्धन केले आहे हे जगाला समजले आहे, अशा भाषेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी ममता यांच्या नेतृत्वावर स्तुतिसुमने उधळली आहेत.
Mamata Banerjee invited to attend peace conference in Rome, will be attended by pope Francis an Egyptian Imam
महत्त्वाच्या बातम्या
- सेक्स गुलाम बनविण्यासाठी तालीबान अफगणिस्थानातील घराघरात मुली आणि विधवांचा घेतेय शोध
- अभिनेते प्रशांत दामले राज्य सरकारवर संतप्त, मोगॅँबो खुश हुआ म्हणत हॉटेल-मॉल्स मालकांचे अभिनंदन करत साधला निशाणा
- शिक्षणसम्राट मंत्र्यांना सामान्यांपेक्षा आपल्या संस्थांचीच काळजी, १५ टक्के फी कपातीवरून मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी
- Maharashtra Unlock : 15 ऑगस्टपासून लॉकडाऊन मधून ‘स्वातंत्र्य’; टास्क फोर्सचा शाळा, महाविद्यालयं सुरू करण्यास विरोध