विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maha Vikas Aghadi महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाल्याची बातमी असून ठाकरे विरुद्ध काँग्रेस सामना बरोबरीत सुटला, तर पवारांच्या पक्षाला नुकसानभरपाई देणे तर दूरच, उलट त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तिसऱ्या नंबरवर ढकलून वरती त्यांच्याच पक्षाच्या वाट्यातल्या 4 जागा महाविकास आघाडीतल्या छोट्या घटक पक्षांसाठी सोडायला भाग पाडल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी 100, तर पवारांच्या राष्ट्रवादीला 84 आणि उर्वरित 4 जागा महाविकास आघाडीतल्या छोट्या घटक पक्षांना देण्याचा फॉर्म्युला निश्चित केल्याची बातमी समोर आली आहे. Maha Vikas Aghadi
लोकसभा निवडणुकीच्या वेळी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 48 पैकी फक्त 10 जागा लढवण्यासाठी आल्या होत्या. त्यावर आम्हीच महाविकास आघाडीकडे कमी जागा मागून घेतल्या. त्यांची भरपाई विधानसभा निवडणुकीत करून घेऊ. तेव्हा कमी जागा मान्य करणार नाही. आमच्या ताकदीनुसार जास्त जागा खेचून घेऊ, अशी मखलाशी शरद पवारांनी केली होती.
प्रत्यक्षात विधानसभेच्या जागावाटपाच्या चर्चांमध्ये पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 84 जागा आल्या. उरलेल्या 4 जागा महाविकास आघाडीतल्या छोट्या घटक पक्षांसाठी सोडायला भाग पडले. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातला मोठा भाऊ – छोटा भाऊ यांच्यातला वाद बरोबरीत मिटला. ते दोन्ही पक्ष प्रत्येकी 100 लढवायचे मान्य करून “जुळे भाऊ” बनले. पण या जुळ्या भावांनी पवारांच्या पक्षाला लोकसभेत झालेली नुकसान भरपाई विधानसभेत देण्याऐवजी त्यांना तिसऱ्या क्रमांकावर ढकलून ते मोकळे झाले.
महाविकास आघाडीची जागावाटपा संदर्भातील मुंबईत संपन्न झाली. या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. Maha Vikas Aghadi
काय आहे जागांचा फॉर्म्युला
विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीतील घटक पक्षांचे ठरलं असल्याचे सांगितलं जात आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 पैकी 100 – 100 जागा काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट लढणार आहे, तर 84 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहेत. तर उर्वरित 4 जागा मित्र पक्षांसाठी सोडल्या जाणार आहेत. काही जागांवर विशेषकरून विदर्भातील जांगावर अजूनही तिढा कायम आहे, मात्र लवकरच हा तिढा सोडवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. Maha Vikas Aghadi
विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि कोकणातील काही जागांवर वादाची स्थिती आहे. काही जागांवर आघाडीतील दोन पक्ष दावा सांगत असल्याने या जागांवर निर्णय होऊ शकला नाही. दोन्ही पक्षात वाद असलेल्या जागांवर पुढील आठवड्यात बैठका घेऊन तोडगा काढून जागा वाटपावर शिक्कामोर्बत करून तसे पत्रकार परिषदेत जाहीर केले जाईल.
Maha Vikas Aghadi formula, shivsena – Congress 100 each, NCP 84, others 4
महत्वाच्या बातम्या
- PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेतून पारंपरिकता आणि कौशल्याला नवीन ऊर्जा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
- Nitesh Rane : वड्याचे तेल वांग्यावर; राष्ट्रवादीकडून नवाब मलिक प्रकरणाची आगपाखड नितेश राणेंवर!!
- Rameshbhai oza : आपले कार्य उपकार नाही, तर साधना : रमेशभाई ओझा; वनवासी कल्याण आश्रमाचे हरियाणात राष्ट्रीय कार्यकर्ता संमेलनाचे उद्घाटन
- Hezbollah : पेजर-वॉकी-टॉकी स्फोटानंतर, हिजबुल्लाच्या गडावर आणखी एक हल्ला