पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि त्याच सोबत ती सूर्याभोवती फिरते या व्यतिरिक्त पृथ्वीची अजून एक गती आहे म्हणजे परांचन गती इंग्रजीमध्ये तिला प्रिसीजन मोशन असे म्हणतात. पृथ्वी सरळ उभी नसून ती तीच्या अक्षाभोवती २३.५ अंशाने कललेली आहे. पृथ्वीचा अक्ष सरळ नसून तो २३.५ अंशांनी कललेला आहे. Is the pole star really stable?
खालील चित्रामध्ये पृथ्वीच्या अक्षाची फेरी दाखविली आहे. या तिसर्याव गतीमध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते तो पृथ्वीचा कललेला अक्ष देखिल फिरतो. या पृथ्वीच्या कललेल्या अक्षाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जवळपास २६,००० वर्षे लागतात. या २६,००० वर्षांमध्ये पृथ्वीचा अक्ष आकाशामध्ये एक फेरी पूर्ण करताना तो अक्ष निरनिराळ्या दिशेने रोखला जातो आणि ज्यावेळेस या पृथ्वीच्या अक्षाच्या फेरीमध्ये एखादा तारा येतो तेव्हा तो तारा काळातील पृथ्वीचा ध्रुवतारा म्हणून ओळखला जातो.
अंतराळातील तार्यांच्यामध्ये पृथ्वीचा कललेला अक्ष फेरी पूर्ण करताना इतर तारे त्याच्या जागेमध्ये आल्याने तो तारा पृथ्वीचा ध्रुवतारा बनतो. म्हणजेच ध्रुवतार्या चे स्थान अढळ नाही. परांचन गतीचा फेरीमध्ये पृथ्वीचा ध्रुवतारा नेहमीच बदलला आहे. सध्याचा ध्रुवतारा हा देखिल काही काळाने बदलून भविष्यामध्ये दुसराच तारा ध्रुवतारा असेल. सध्याचा ध्रुवतारा देखिल पृथ्वीच्या बरोबर अक्षावर नसून तो किंचितसा बाजूला असल्याने तो देखिल छोट्या जागेमध्ये फिरताना दिसतो.
रात्रभर केलेल्या तार्यां च्या छायाचित्रणातून इतर तार्यांचे एक रिंगण झाले आहे तर त्या रिंगणाच्या मध्यभागी एक छोटासे रिंगण आहे असे लक्षात आले. प्रत्यक्षात ध्रुवतार्यायचे रिंगण आहे. ध्रुवतारा पृथ्वीच्या बरोबर अक्षावर नाही त्यामुळे तो देखिल छोट्या जागेमध्ये फिरताना दिसतो. पृथ्वीचा ध्रुवतारा हा फक्त पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातच नसून तो दक्षिण गोलार्धात देखिल असू शकतो.
कारण पृथ्वीचा अक्ष हा दोन्ही बाजूस आहे. परंतु पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अक्षाच्या परांचन गतीमुळे होणार्यान आकाशातील रिंगणामध्ये सध्यातरी कुठलाही तेजस्वी तारा नसल्याने इथे सध्या ध्रुवतारा नाही. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अक्षाच्या परांचन गतीमुळे होणार्या् आकाशातील रिंगण दाखविले आहे. जेथे सध्यातरी कुठलाही तेजस्वी तारा नसल्याने सध्या पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील ध्रुवतारा नाही.