मुंब्रा – ठाणे – अमरावती – मातोश्री; मनसे – पीएफआय; राणा ‘ शिवसेना धमक्या सगळ्यांनीच एकमेकांना दिल्या आहेत, पण आपापल्या एरियातून…!! आज हनुमान जयंती निमित्त सगळीकडे हनुमान चालीसाचा गजर सुरू आहे. पण हा गजर सुरू असतानाच मशिदींवरचे भोंगे या विषयावर राजकारण सुरू आहे. याच मुद्द्यावरून विविध पक्ष संघटना आणि नेत्यांनी एकमेकांना धमक्या दिल्या आहेत, पण हे सगळे करताना या संघटनांनी आणि नेत्यांनी आपापला एरिया सोडलेला नाही, हे महत्त्वाचे आहे…!! Hanuman Chalisa: Mumbra – Thane Amravati – Matoshri; MNS – PFI, Rana – Shiv Sena; Threats from everyone, but from their own area !!
मशिदींवरचे भोंगे उतरवणार नाही. छेडेंगे तो छोडेंगे नाही अशी धमकी पीएफआय या मुस्लिम संघटनेने मनसेला मुंब्रा येथून दिली आहे, तर त्यावर मनसेचे ठाण्यातले नेते अविनाश जाधव यांनी मुंब्रात तुमच्या एरीयातच थांबून आम्हाला काय धमक्या देता?, समोर आला तर तोडून टाकू, असा प्रतिइशारा दिला आहे.
हनुमान चालीसा भोंग्यांवर होणारच. केंद्र सरकारने आता पुढाकार घेऊन सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे आणि मशिदींवरचे भोंगे उतरवावेत, अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे. मनसेने मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे आणि अन्य शहरांमध्ये हनुमान चालीसाचे पठण केले आहे.
अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसाचे पठण करून मातोश्रीला तेथे येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे मातोश्रीवर शिवसैनिकांनी जमून रवी राणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या निमित्ताने मातोश्री भोवती शिवसैनिक जमवण्याचे कौशल्य काही शिवसेना नेत्यांनी दाखवले आहे. नवनीत राणा यांना मातोश्री परिसरात फिरकू देणार नाही, असा इशारा या शिवसैनिकांनी दिला आहे.
नवनीत राणा अमरावतीतच आहेत पण आपण मुंबईची मुलगी आहोत. त्यामुळे आपल्याला मुंबईला येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला एकूण सर्वच पक्षांनी आणि नेत्यांनी एकमेकांना धमक्या जरूर दिल्या आहे, पण त्या आपल्या एरियात राहूनच, ही आजची वस्तुस्थिती आहे…!!
अर्थात आपापले एरिया सांभाळले तरच आपल्याला राजकारणात कोणी विचारणार आहे याची पक्की जाणीव या संघटनांना आणि नेत्यांना आहे. हेच यातले खरे इंगित आहे.
Hanuman Chalisa : Mumbra – Thane Amravati – Matoshri; MNS – PFI, Rana – Shiv Sena; Threats from everyone, but from their own area !!
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईत एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले, अपघातात कोणतीही जीवितहानी नाही
- गुजरातमध्ये मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांना घडविली अद्दल; दुकानांवर चालविला बुलडोझर
- खरगोन हिंसाचाराला चिथावणी दिल्याप्रकरणी दिग्विजय सिंह यांच्याविरोधात चार गुन्हे दाखल
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या चाचणीच्या चर्चा; ३५० किलोमीटर वेगाने घेतली जाणार चाचणी
- कोल्हापूर उत्तर : काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना आघाडी; भाजपचे सत्यजित कदम पिछाडीवर