• Download App
    Pune मुंबईचे रिपीटेशन पुण्यात; दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या संघर्षात काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी डब्यात!!

    Pune : मुंबईचे रिपीटेशन पुण्यात; दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या संघर्षात काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी डब्यात!!

    पुणे : मुंबईचे रिपीटेशन पुण्यात; दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या संघर्षात काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी डब्यात!! अशी स्थिती पुणे महानगरपालिका निवडणूकीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि याला कारण माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा काँग्रेस सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतला प्रवेश झाला आहे.

    पण रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यात डब्यात कशा काय जातील??, असा सवाल कुणाच्याही मनात येऊ शकतो. तर त्याचे उत्तर असे, की पुणे महानगरपालिका निवडणूक मध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढताना एवढी भांडी वाजवतील आणि दंगा करतील की, त्यामध्ये एकेकाळी पुणे महापालिकेवर वर्चस्व राखलेल्या काँग्रेस आणि त्यानंतरची राष्ट्रवादी यांचे आवाज लुप्त होण्याची शक्यता आहे.

    याचे उदाहरण 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत यापूर्वी दिसले होते. त्यावेळी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि अखंड शिवसेना असे युतीचे सरकार होते आणि त्या दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिका निवडणूक स्ट्रॅटेजिकली लढवायचा निर्णय घेतला ते दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आणि त्यांनी एवढी भांडी वाजवली आणि दंगा केला की, त्यामध्ये एकेकाळी मुंबई महापालिकेवर वर्चस्व गाजविलेल्या आणि नंतर बळकट विरोधी पक्ष म्हणून अस्तित्व राखलेल्या काँग्रेसचा सुपडा पूर्ण साफ झाला होता. त्या निवडणुकीत शिवसेनेचे 84 आणि भाजपचे 82 नगरसेवक निवडून आले होते, तर काँग्रेसला अवघ्या 32 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अखंड होती, पण मूळातच संघटनात्मक पातळीवर अस्तित्वात नसलेल्या पक्षाला मुंबई महापालिकेत काही मिळणारच नव्हते. त्यामुळे त्यांची राष्ट्रवादी यशाच्या बाबतीत खडखडाटीच राहिली होती.



    पुणे महापालिकेत एकेकाळी सुरेश कलमाडींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे जबरदस्त वर्चस्व होते, पण अखंड राष्ट्रवादी काँग्रेसने त्या वर्चस्वाला सुरुंग लावला. पाच – दहा वर्ष शरद पवार आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीची महापालिकेमध्ये सत्ता होती. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या वर्चस्वाच्या काळात भाजपाचे पुणे महापालिकेत अस्तित्व नव्हते, असे बिलकुल नाही. उलट त्याच काळात भाजप संघटनात्मक पातळीवर पुण्यात मजबूत होता. कारण महापालिकेमध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे वर्चस्व असले, तरी पुण्याचा खासदार मात्र भाजपचा असायचा. शिवाय पुणे महापालिकेमध्ये भाजपचे प्रभावी संख्येने नगरसेवक होते. 2014 नंतर मात्र भाजपने पुणे महापालिकेवर टप्प्याटप्प्याने वर्चस्व निर्माण केले. यासाठी अखंड राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधलेच अनेक नगरसेवक आणि निवडून येण्याची क्षमता असणारे नेते पक्षात घेऊन त्यांच्या खिशाला कमळ चिन्ह लावले.

    आज पुण्यामध्ये भाजप सर्वात प्रबळ संघटना म्हणून अस्तित्वात आहे. त्यांच्या खालोखाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नंबर लागत असला तरी महायुतीतला एक घटक पक्ष यापेक्षा त्याचे महत्त्व फार उरलेले नाही. कारण अजितदादांची ताकद सध्याच्या भाजपाच्या तुलनेमध्ये फारच कमी आहे ताकद वाढवून महापालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला काटशह देणे ताकद शिंदे निर्माण करू शकतात अशी स्थिती येऊन ठेपली आहे. यात रवींद्र धंगेकरांची वैयक्तिक राजकारण तर शिजूनच जाईल, पण भाजप मधून चंद्रकांतदादा पाटील विरुद्ध रवींद्र धंगेकर या जोरदार लढाईत भाजप आणि शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणावर भांडी वाजवतील आणि दंगा करतील की, त्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आणि उरल्या सुरल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आवाजच लुप्त होण्याची शक्यता आहे. राहता राहिलेली काँग्रेस आपापल्या ठिकाणी अस्तित्व शोधण्याच्या कामाला लागलेली दिसण्याची शक्यता आहे.

    Fight between BJP and Shivsena may demolish Congress and both in NCP in Pune

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस