कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भाजपच्या नगरसेविका जयश्री जाधव या काँग्रेसच्या तिकिटावर जिंकल्या आहेत आणि शिवसेनेने आपला कायमचा बालेकिल्ला गमावून देखील शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आनंदाच्या घुगऱ्या खात आहेत. Congress wins Kolhapur by-election; Shiv Sena’s Sanjay Raut is eating happy cheers !!
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक जयश्री जाधव यांनी जिंकून भाजपच्या सत्यजित कदमांवर मात केली, पण यामध्ये शिवसेनेने आपला बालेकिल्ला मात्र कायमचा गमावला. शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी 15 वर्षे हा बालेकिल्ला टिकवून ठेवला होता. पण काँग्रेसने अवघ्या अडीच वर्षांच्या कालावधीत दोन निवडणुका जिंकून शिवसेनेचा बालेकिल्ला त्यांच्याकडून हिरावून घेतला आहे.
असे असले तरी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मधल्या काळात भोंग्यांवरून जे राजकारण केले त्यांचे भोंगे कोल्हापूरच्या जनतेने उतरवले आहेत. हिंदुत्व कोणाला शिकवता? श्रीराम आणि हनुमान आमच्या पाठीशी उभे आहेत. तथाकथित हनुमान भक्तांना हनुमान स्तोत्र किंवा हनुमान चालीसा ही म्हणता येत नाही, अशा एका पाठोपाठ फैरी संजय राऊत यांनी नाशिक मध्ये येऊन प्रेस कॉन्फरन्स मध्ये झाडल्या.
आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा
त्याच वेळी त्यांनी शिवसेनेचे मंत्री आणि नेते आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. राज ठाकरे यांचा आयोध्या दौऱ्याला काटशह म्हणून हा दौरा आदित्य ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात करणार आहेत. नाशिक शिवसेना त्यासाठी यजमान म्हणून काम करणार आहे. महाराष्ट्रात राम राज्य आणण्याचा संकल्प महाराष्ट्राची शिवसेना आयोध्येत जाऊन करेल अशी घोषणा संजय राऊत यांनी केली आहे. त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रातून अयोध्येत जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी यात्रीनिवास अशासारखी काही व्यवस्था करता येईल का?, याची देखील पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
कोल्हापूर मध्ये काँग्रेस जिंकल्यानंतर कोल्हापूरचा पुरोगामी मतदाराने जातीयवादी पक्षाला प्रत्युत्तर दिल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे, तर शिवसेनेच्या नेत्यांना हा विजय म्हणजे भोंग्यांच्या राजकारणाचा पराभव असल्याचे वाटत आहे. याखेरीज या विजयातून शिवसेनेला महाराष्ट्रात रामराज्य आले असेच दाखवून द्यायचे आहे. त्यामुळे आजच्या हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करून टाकली आहे.
Congress wins Kolhapur by-election; Shiv Sena’s Sanjay Raut is eating happy cheers !!
महत्त्वाच्या बातम्या
- Kolhapur Byelection : कोल्हापूर उत्तर मध्ये जिंकली काँग्रेस; हरला भाजप; पण दणका मात्र शिवसेनेला!!
- पुतीन यांना मुलीचा गॉडफादर म्हणणाऱ्या व्यक्तीची ५५ घरे, २६ कार युक्रेनमध्ये जप्त
- पंजाबमध्ये १ जुलैपासून घरगुती ग्राहकांना ३०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा
- रशियाचे २० हजार सैनिक मारले, युक्रेनचा दावा; युद्ध सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला
- एअर इंडिया कर्मचाऱ्यांना देणार टप्प्याटप्प्याने पूर्ण वेतन; कोरोना नियंत्रणात आल्यामुळे निर्णय