नाशिक : महाविकास आघाडीत राहून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यासारखी माध्यमांमध्ये चमकोगिरी करण्यापेक्षा काँग्रेसने लोकसभा निवडणुकीचा निकालाचा नीट अभ्यास करून पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीला सुरुवात केली आहे. Congress consolidates Maratha + Muslim combination in maharashtra
उद्धव ठाकरेंनी जरी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचा आग्रह धरून काँग्रेस आणि पवारांची कोंडी केली असली, तरी प्रत्यक्षात काँग्रेसने अत्यंत चाणाक्षपणे, पण आपल्या निष्ठावंत नेत्यांना बक्षिसी दिली आहे. किंबहुना सोशल इंजिनिअरिंग करून काँग्रेसने दमदारपणे मुख्यमंत्रीपदाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पण ही वाटचाल काँग्रेसने माध्यमांमध्ये मात्र जाहीर करण्याची घाई केलेली नाही.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल रात्री उशिरा बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस कार्यकारिणीवर नियुक्ती केली. त्याचबरोबर नसीम खान यांची कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती केली, तसेच सय्यद मुजफ्फर हुसेन यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली.
या तीन नियुक्त्यांमधून काँग्रेसने मराठा + मुस्लिम असे सोशल इंजिनिअरिंग करून घेतले. महाराष्ट्रात मराठा आणि मुस्लिम आरक्षणाचा वाद टोक गाठू पाहत आहे. त्याचवेळी काँग्रेसने या पद्धतीचे “double M” अर्थात मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशन चालवून दोन्ही समाजांना काँग्रेसच राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या तारू शकते हे दाखवून दिले आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 13 जागा मिळवून महाराष्ट्रात पहिला नंबर मिळवला. भाजप, दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादींना पिछाडीवर ढकलले. यात काँग्रेसचा पारंपारिक मतदार दलित, आदिवासी आणि मुस्लिम आघाडीवर होता. त्यामुळे त्या समाज घटकांमधल्या नेत्यांना सत्तास्थानांवर प्रस्थापित करणे ही काँग्रेसची जबाबदारी होती. ती जबाबदारी काँग्रेसने शांतपणे पार पाडली.
नसीम खान हे काँग्रेस श्रेष्ठींवर नाराज होऊन बंडखोरीच्या तयारीत होते. त्यांना काँग्रेस कार्यकारिणीवर विशेष निमंत्रित म्हणून स्थान देऊन त्यांचा सन्मान वाढविला आहे. त्याआधी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात देखील काँग्रेसने नसीम खान यांनाच काँग्रेसतर्फे भाषणाची पहिली संधी दिली त्यातून काँग्रेसमध्ये त्यांचे राजकीय वजन वाढल्याची चुणूक मिळालीच होती. त्याचबरोबर प्रदेश काँग्रेस कार्यकारणीत मुजफ्फर हुसेन यांच्या रूपाने मुस्लिम नेत्याला थेट कार्यकारी अध्यक्ष केल्याने मुस्लिम समाजातल्या दोन नेत्यांना काँग्रेसने सन्मान दिल्याचे वातावरण निर्माण केले आहे. त्याच वेळी बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला थेट काँग्रेस कार्यकारिणीत स्थान देऊन त्यांचे केंद्रीय पातळीवरचे महत्त्व वाढविले आहे. अर्थातच आता काँग्रेसकडे पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासारखे दोन तगडे मराठा नेते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात, याचे संकेतच काँग्रेस श्रेष्ठींनी दिले आहेत.
शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे राजकीय दृष्ट्या वाकडे आहे. आयत्यावेळी शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाला खोडा घातला, तर बाळासाहेब थोरात यांचे नाव पुढे करता यावे त्याचबरोबर त्यांना केंद्रीय काँग्रेस कार्यकारिणी स्थान देऊन त्यांच्या नाड्या थेट काँग्रेस श्रेष्ठींच्या हातात राहाव्यात याचीही व्यवस्था केली गेली आहे.
– पवार, ठाकरेंच्या पक्षांची नुसती चमकोगिरी
एरवी महाविकास आघाडीतले पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना या दोन पक्षांचे नेते माध्यमांमध्ये राहून विविध वक्तव्ये करून चमकोगिरी करतात. पण काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांपुढे मुत्सद्देगिरीत तोकडे पडतात. ताकद मर्यादित असूनही मुख्यमंत्री पदाच्या वल्गना करत राहतात. या पार्श्वभूमीवर काँग्रेस श्रेष्ठींनी ज्या पद्धतीने बाळासाहेब थोरात, नसीम खान आणि मुजफ्फर हुसेन यांची संघटनात्मक बढती केली आहे, ते पाहता काँग्रेसने संघटनात्मक मजबुती करण्याबरोबरच महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर मजबूत दावा ठोकण्याच्या दृष्टीने दमदार वाटचाल केल्याचेही दिसत आहे.
Congress consolidates Maratha + Muslim combination in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Ajit pawar : पवारांबाबत अजितदादा आता फारच सॉफ्ट; शिरणार का पुन्हा काकांच्या पुठ्ठ्यात??; की ते सत्तेची वळचण बदलण्याच्या बेतात??
- Chief Justice Chandrachud : बांगलादेशातील संकटावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- IMA strike : 17 ऑगस्ट रोजी देशभरात IMAचा संप ; म्हणाले ”रुग्णालयांना ‘सेफ झोन’ घोषित करा”
- प्रशांत किशोर यांनी जेडीयू आणि आरजेडीवर साधला निशाणा!