• Download App
    मेंदूचा शोध व बोध : श्वासोच्छ्वास, हृदयाची स्पंदने, शरीराचे तापमान, शारीरिक संतुलन सांभाळणारा ब्रेन स्टेम । Brain Discovery: Cognition: Breathing, Heartbeat, Body Temperature, Balancing Brain Stem

    मेंदूचा शोध व बोध : श्वासोच्छ्वास, हृदयाची स्पंदने, शरीराचे तापमान, शारीरिक संतुलन सांभाळणारा ब्रेन स्टेम

    शरीर, मन, भावना, बुद्धी या सर्वांचे नियंत्रण मेंदूतूनच होत असते. मेंदूतील सर्वांत छोटा घटक म्हणजे त्यातील विशिष्ट पेशी. या पेशींना न्यूरॉन्स सेल्स असे म्हटले जाते. प्रत्येक न्यूरॉन आपापल्या कामातील तज्ज्ञ असतो. न्यूरॉनचे काम जितके वैशिष्ट्यपूर्ण असेल तितकी ती पेशी खास. त्यामुळे एका न्यूरॉनचे काम दुसऱ्या न्यूरॉनला शिकवणे अवघड असते. त्वचा, यकृत किंवा फुप्फुसांचे मात्र तसे नसते. Brain Discovery: Cognition: Breathing, Heartbeat, Body Temperature, Balancing Brain Stem

    या अवयवांमधील अनेक पेशी एकसारख्या दिसतात, वागतात आणि एकत्र येऊन एकसारखेच कामही करतात. त्यामुळेच या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते. परंतु, मेंदूचे प्रत्यारोपण हे अद्यापही एक असाध्य स्वप्न आहे. कारण प्रत्येक मेंदू निराळा घडलाय आणि प्रत्येक मेंदूतील प्रत्येक पेशीची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. मेंदूचे मोठा मेंदू, छोटा मेंदू आणि ब्रेन स्टेम असे तीन भाग असतात. मोठ्या मेंदूला डावी आणि उजवी अशा दोन बाजू असतात. साधारणतः डाव्या बाजूकडून भाषा, गणित आणि तर्क याबाबत विचार केला जातो, तर उजव्या बाजूने सर्जनशीलता, स्थानिक माहिती, संगीत याबाबत माहिती साठवली जाते. मोठ्या मेंदूचे दृष्टी, स्पर्शज्ञान, स्मृती, भावना, स्मृती व निर्णय क्षमता असे पाच भाग असतात. कधी आणि किती याचे मोजमाप करण्याचे काम छोट्या मेंदूचे असते.

    शरीराच्या हालचालींचे फाइन ट्युनिंग छोट्या मेंदूद्वारे केले जाते. ब्रेन स्टेम हा उत्क्रांतीच्या दृष्टीने मेंदूचा सर्वात जुना भाग समजला जातो. हा भाग शरीराला लागणारे सर्व मूलभूत व अत्यावश्यक कार्य; जसे श्वासोच्छ्वास, हृदयाची स्पंदने, शरीराचे तापमान, शारीरिक संतुलन इत्यादी सांभाळतो. ब्रेन स्टेमला इजा झाली, तर जीव धोक्यात येतो. एकदा मेंदूची वाढ थांबली की, त्यात नवीन पेशी तयार होत नाहीत, असा काही वर्षांपूर्वीपर्यंत समज होता. परंतु, मेंदूतील काही विशिष्ट जागांमध्ये नवीन पेशींचे निर्माण कार्य सुरू असते, असे शास्त्रज्ञांना आढळून आले. मेंदूची काळजी घ्यायची असेल, तर आपल्या जीवनशैलीवर नियंत्रण हवे. या महत्त्वाच्या आणि उत्कृष्ट अवयवाची आपणच काळजी घेतली पाहिजे.

    Brain Discovery: Cognition: Breathing, Heartbeat, Body Temperature, Balancing Brain Stem

    Related posts

    उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    काँग्रेसला खरं तर अख्ख्या बिल्डिंग रीडेव्हलपमेंटची गरज; पण निदान आता प्लंबर तरी बोलवा!!