• Download App
    हत्ती - उंट - घोडे!!; ममतांवर निशाणा, पण टार्गेट कोण?; अशोकरावांना विलासराव आत्ताच का आठवले...??Ashok chavan takes on mamata and Pawar; shares video of vilasrao deshmukh on Twitter

    हत्ती – उंट – घोडे!!; ममतांवर निशाणा, पण टार्गेट कोण?; अशोकरावांना विलासराव आत्ताच का आठवले…??

    नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे राजकीय अस्तित्व नाकारल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यामध्ये केंद्रीय पातळीवरून असून ते प्रदेश पातळीपर्यंत सर्व नेत्यांचा समावेश आहे.Ashok chavan takes on mamata and Pawar; shares video of vilasrao deshmukh on Twitter

    परंतु महाराष्ट्राचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया मात्र सर्वात वेगळी आहे. त्यांनी विलासराव देशमुख यांचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांचा निशाणा जरी ममता बॅनर्जी असल्या तरी टार्गेटवर मात्र शरद पवार आहेत हे दिसून येत आहे…!!



    मराठी माध्यमांनी या विषयीच्या बातम्या देताना “ममतांना अशोक चव्हाण यांचे प्रत्युत्तर”, अशा आशयाने बातम्या दिल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात विलासराव देशमुख यांच्या भाषणातला मुद्दा लक्षात घेतला तर ते उंटाची तिरकी चाल आणि घोड्याची अडीच घरी चाल असे नेमके कोणाला म्हणत आहेत हे स्पष्ट होताना दिसते आहे. विलासरावांचे ते भाषण थेट शरद पवार यांना उद्देशून आहे आणि त्या भाषणाचा व्हिडिओ भाषण अशोक चव्हाण यांनी आजच ट्विटरवर शेअर केला आहे.

    अशोक चव्हाण यांना नेमके आजच विलासराव देशमुख आठवायचे काय कारण आहे? त्याचबरोबर विलासराव देशमुख हेच आठवण्याचे काय कारण आहे? यातच अशोक चव्हाण यांच्या प्रतिक्रियेची राजकीय मेख दडली आहे. ममता बॅनर्जी यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. सिल्वर ओकवरच्या पोर्चमध्ये उभे राहून त्यांनी यूपीएचे अस्तित्व नाकारले. त्यावेळी शरद पवार हे त्यांच्या शेजारी उभे होते. ममता बॅनर्जी यांची कार्यशैली हत्तीसारखी थेट सरळ विरोधकांना संपवणारी आहे.

    काँग्रेसला त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये शून्यवत केले आहे. विलासरावांच्या भाषणातील काँग्रेसची चाल हत्तीसारखी सरळ आहे, हा संदर्भ ममता बॅनर्जी यांच्यासाठी चपखल लागू होतो…!! पण तो संदर्भ शरद पवार यांच्यासाठी लागू होतो का…?? की उंटाची तिरकी चाल आणि घोड्याची अडीच घरी चाल हा संदर्भ पवार यांच्या राजकारणाला लागू होतो!!??, हे महाराष्ट्रातल्या जनतेला वेगळे समजून सांगण्याची गरज नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया सगळ्यात वेगळी आहे ती नेमकी आणि अचूक बाण मारणारी आहे हे स्पष्ट होते.

    – विलासराव – पवार “अहि – नकुल” संबंध!!

    काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी देखील ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट हे पूर्वनियोजित षडयंत्र होते असा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर हत्तीची सरळ चाल, उंटाची तिरकी चाल आणि घोड्याची अडीच घरी चाल या अशोक चव्हाण यांच्या प्रतिक्रियेचे वेगळे महत्त्व अधोरेखित होते. ममता बॅनर्जी यांच्या राजकीय विधानाच्या निमित्ताने ते अशोक चव्हाण यांनी केलेले असले तरी त्यांचे राजकीय टार्गेट शरद पवार आहेत हेही यानिमित्ताने स्पष्ट होते. त्याच बरोबर विलासराव देशमुख यांचे पवार यांच्याशी असलेले “अहि – नकुल” संबंध यांचाही चपखल वापर अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रियेत केल्याचे दिसून येत आहे…!!

    Ashok chavan takes on mamata and Pawar; shares video of vilasrao deshmukh on Twitter

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस