• Download App
    लाईफ स्किल्स : नेहमी आशादायक विचार करा – The Focus India

    लाईफ स्किल्स : नेहमी आशादायक विचार करा

    आपण यश प्राप्त करण्यासाठी स्वत:ला शेकडो संधी देवू शकता. पण एकदा गेलेली वेळ परत कधी येत नसते. त्यामुळे वेळेनुसार बदल करीत यशाला गवसणी घातला आली पाहिजे. कोणत्या गोष्टीत किंवा जीवनात यश मिळवायचे असेल तर काही बाबी जरूर केल्या पाहिजेत. पहिले म्हणजे आपण नेमके काय कणार आहोत हे आधी ठरवा. म्हणजेच सर्व प्रथम, एक ध्येय तयार करा आणि ते साध्य करण्यासाठीची योजना आखा.Always think positive

    या योजनेचा तारीखवार असा आराखडा एका वहीत स्वच्छ पेनाने लिहा. हे उद्दीष्ट अशा प्रकारे तयार केले जाणे आवश्यक आहे. म्हणजे आपले ध्येय गाठण्यासाठी केव्हा, काय, किती करायचे तसेच कोणाबरोबर कसे वागायचे आदींचा सारा तपशीलही ठरवा. आपल्या यशाकडे नेणाऱ्या योजनेत नकाराला आजिबात स्थान देवू नका. नेहमी आशादायक विचार करा. तेच फायद्याचे असतात. सूत्रीकरण मध्ये समाविष्ट केलेले सर्व क्रियापद परिपूर्ण असले पाहिजेत, जसे मी हे करेन, आणि मी ते करण्याचा प्रयत्न करेन असे शब्दप्रयेग मनला असले पाहिजे.

    यशाची खरी सुरुवात आधी डोक्यात किंवा मनात होत असते आणि मग कृती घडते. त्यामुळे आधी यश व्हिज्युलाईज करा. तरच तुम्हाला यश मिळेल. खेळाडूंचे पहा. जेव्हा ते मैदानात उतरतात त्यावेळी जिकंण्याची जिद्द घेवूनच. त्यांच्यातील जिगर त्यांना यशाकड नत. आपण अनेकदा क्रिकेट किंवा फुटबॉलसारखे सांघिक किंवा बॅटमिंटन, टेनिससारखे वैयक्तिक सामने पाहिले असतील. यात अनेकदा खेळाडू पराभवाच्या छायेतून जिगरबाजपणे विजय खचून आणतात. यश मिळवण्याची ही जिगर त्यांच्यात येते कोठून.

    यासाठी वर उल्लेख केल्याप्रमाणे ते मनात नकाराला कधी स्थानच देत नाहीत. त्यामुळे त्यांचे सारे शऱीर व मन केवळ विजय मिळवण्याच्या कामासाठीत झटत असते. खेळाडूंचा हा आदर्श प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक जीवनातदेखील अंगिकारायला काहीच हरत नाही.

    Always think positive

     

    Related posts

    धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे श्रेय कॉक्रोच जनता पार्टीला मिळाल्याने राहुल गांधी अस्वस्थ; म्हणून अमित शाह “नवे टार्गेट”!!

    CJP : कॉकरोच जनता पार्टीच्या हेतूंना हरताळ; धर्मेंद्र प्रधानांचे जोरदार स्वागत, “व्हिलन” ठरायच्या ऐवजी झाले “हिरो”!!

    CJP, E20 जनता पार्टीच्या बरोबरीने RHA चा पण उदय, तब्बल 39 लाख फॉलोवर्स!!; RHA म्हणजे काय??, त्या आंदोलनाचा हेतू काय??; वाचा सविस्तर!!