नाशिक : राहुल गांधींवर “शक्ती” पडली भारी मोदींची दक्षिण दिग्विजयाची तयारी!!, असे चित्र राहुल गांधींच्या मुंबईतल्या महारॅलीतल्या भाषणानंतर उभारून आले आहे. मुंबईतल्या महारॅलीत मोदी आणि त्यांच्या पाठीशी उभे असणाऱ्या शक्तीनविरुद्ध लढण्याचा एल्गार पुकारला आणि मोदींनी तो मुद्दा चपळाईने उचलत राहुल गांधींवर दक्षिण भारतातून सर्व शक्तीनिशी प्रहार केला. राहुल गांधींच्या शक्तीविरुद्धच्या लढाईला पंतप्रधान मोदींनी दक्षिण भारताच्या दौऱ्यातून असे काही वळण दिले की, काँग्रेस नेत्यांना त्या मुद्द्यापासून हात झटकण्याची देखील संधी मिळाली नाही. 11 Shakti Ammas give special welcome to PM Modi at rally in Tamil Nadu Salem
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेचा समारोप मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर केला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या शक्तीशी आपल्याला लढायचे आहे, असा एल्गार पुकारला. नरेंद्र मोदींच्या पाठीशी धनशक्ती उभी आहे. उद्योगपती मोदींना पैसे देतात आणि त्या उद्योगपतींसाठीच मोदी काम करतात, असा आरोप राहुल गांधींनी केला.
पण राहुल गांधींनी त्या भाषणात “शक्ती” हा शब्दप्रयोग वापरून चूक केली. कारण हिंदू धर्मात “शक्ती” या संकल्पनेला देवीचे रूप मानले जाते. राहुल गांधींनी “शक्ती” हा शब्दप्रयोग वापरून हिंदू देवताचा अपमान केला, असा आरोप मोदींनी केला.
दक्षिण भारताच्या दौऱ्यात मोदींनी तेलंगण मधल्या जगतियाल, पलनाडू, केरळ मधल्या पलक्कड, तामिळनाडू मधल्या कोयमतुर आणि सालेम इथल्या सभा आणि रोडशो मध्ये राहुल गांधींच्या “शक्ती” शब्दप्रयोगाचा असा काही वापर करून घेतला की, त्यामुळे दक्षिण भारतातली सगळी बाजीची पलटून गेली. पंतप्रधान मोदींना दक्षिण भारताच्या दौऱ्यात तुफान प्रतिसाद मिळाला. त्यातही त्यांच्या भाषणांना महिलांनी तुफान प्रतिसाद दिला.
दक्षिण भारतातल्या प्रत्येक भाषणामध्ये राहुल गांधींवर टीका करताना मोदींनी “शक्ती” म्हणजे भारतमाता “शक्ती” म्हणजे या देशातली “महिला शक्ती”, “शक्ती” म्हणजे देवी स्वरूपा हे जनतेच्या मनावर ठसवले आणि त्या शक्ती स्वरूपाविरुद्ध राहुल गांधी आणि त्यांची “इंडिया” आघाडी लढायला उतरली आहे. तिचा मुकाबला मी तुमच्या म्हणजे “महिला शक्तीच्या” बळावर करेन, अशी गर्जना मोदींनी केली.
एरवी राहुल गांधींनी “शक्ती” हा शब्द न उच्चारता मोदींवर टीका केली असती, तर मोदींना राहुल गांधींवर त्याच स्वरूपाचा पलटवार करण्याची संधी मिळालीच नसती. पण राहुल गांधींनी शक्ती शब्दप्रयोग वापरला आणि त्यामुळे मोदींनी संधी मिळाली, ती त्यांनी उत्तम साधली. त्यामुळे दक्षिण भारताचा त्यांचा दौरा पूर्ण यशस्वी झाला.
राहुल गांधींनी दिली संधी…
दक्षिण भारतामध्ये चार राज्यांमध्ये 129 लोकसभेच्या जागा आहेत. त्या मोदींच्या दौऱ्याच्या एका झपाट्यात कव्हर करण्याची भाजपची मूळची योजना होती, पण तो केवळ पंतप्रधान मोदींचा सर्वसाधारण दौरा ठरला असता, पण राहुल गांधींच्या “शक्ती” या शब्दावरच्या टीकेमुळे त्या दौऱ्याला प्रचंड वेगळी धार चढली, दक्षिणेतली “महिला शक्ती” पंतप्रधान मोदींभोवती एकवटण्याची संधी भाजपने घेतली. त्यांच्या प्रत्येक रोड शो मध्ये आणि जाहीर सभेमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने महिला आणण्याची व्यवस्था पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली. अनेक ठिकाणी “शक्ती” स्वरूपा महिला आणि मुलींनी मोदींचे स्वागत केले. मोदींनी आपल्या भाषणामध्ये शक्ती आपली सगळी भाषणे “शक्ती” या शब्दाभोवतीच केंद्रित करून राहुल गांधींवर सातत्याने वार केले.
…मोदींची झाली चांदी!!
मोदींचा दक्षिण भारताचा दौरा आज संपला. तो खरं तर सर्वसाधारण प्रचार दौरा ठरू शकला असता, पण राहुल गांधींनी मोदींच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या “शक्ती” विरुद्ध लढण्याचा एल्गार पुकारला. त्यामुळे मोदींच्या भाषणाला “शक्ती”ची धार चढली आणि त्यांना राहुल गांधींवर पहिल्या फेरीत मात करता आली.