• Download App
    शिवराजसिंह चौहान: विकासाभिमुख राजकारणाचे पाईक | The Focus India

    शिवराजसिंह चौहान: विकासाभिमुख राजकारणाचे पाईक

     चौथ्यांदा मुख्यमंत्री बनलेले चौहान यांची २००५ मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी बिजली, सडक आणि पाणी हे तीनच मध्य  प्रदेशचे मुख्य प्रश्न होते. मात्र,चौहान यांनी आपल्या विकासात्मक राजकारणाने मध्य प्रदेशचा चेहरा बदलून टाकला. आज देशातील गव्हाचे कोठार म्हणून मध्य प्रदेशची ओळख आहे. विकासाभिमुख राजकारणाचे पाईक अशी चौहान यांचीओळख बनली आहे.

    एकेकाळी बिमारू राज्य अशी ओळख असलेल्या मध्य प्रदेशावरील मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकून विकासाच्या मार्गावर नेणारे शिवराजसिंह चौहान यांनी पुन्हा एकदा मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली आहे.चौथ्यांदा मुख्यमंत्री बनलेले चौहान यांची २००५ मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी बिजली, सडक आणि पाणी हे तीनच मध्य  प्रदेशचे मुख्य प्रश्न होते. मात्र,चौहान यांनी आपल्या विकासात्मक राजकारणाने मध्य प्रदेशचा चेहरा बदलून टाकला. आज देशातील गव्हाचे कोठार म्हणून मध्य प्रदेशची ओळख आहे. विकासाभिमुख राजकारणाचे पाईक अशी चौहान यांचीओळख बनली आहे.
    मध्य प्रदेशातील २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. का‘ंग्रेसला केवळ ४ जागा जास्त मिळाल्या. मतांच्या टक्केवारीत तर भाजपा पुढे होता. मात्र, तरीही भारतीय जनता पक्षाने जनादेश मान्य केला. गेल्या वर्षभरापासून कमलनाथ यांचे सरकार या ठिकाणी होते. या सरकारकडून सुरूवातीला अपेक्षा होत्या. परंतु, कमलनाथ यांनी कॉँग्रेस संस्कृतीतील दरबारी राजकारणच पुढे चालू ठेवल्याने ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉँग्रेसचा त्याग केला. त्यामुळे अल्पमतात आलेल्या कमलनाथ यांनार राजीनामा द्यावा लागला.
    साधेपणा आणि सच्छिल विचारसरणीसाठी शिवराजसिंह चौहान प्रसिध्द आहेत. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवराजसिंह यांनी जनमानसातील नेता आपली ओळख तयार केली आहे. शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असताना पुण्यात एके ठिकाणी त्यांना भेटण्याचा प्रस्तुत लेखकाला योग आला. मध्य प्रदेशातील पर्यटनक्षेत्र वाढीसाठी चौहान यांनी प्रयत्न सुरू केले होते. याचाच एक भाग म्हणून ते पुण्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठ हॉटेलमध्ये गेलो तेव्हा कोणताही जामनिमा नव्हता. बडेजाव नव्हता. आपल्याकडील् आमदाराचाही भपका मोठा असतो. परंतु, मुख्यमंत्री म्हणूनही त्यांच्याकडे कोणताही दिखावूपणा नव्हता. परंतु, आपल्या उदद्देशाबाबत तळमळ होती. मध्य प्रदेशची अत्यंत नेमक्या शब्दांत त्यांनी ओळख सांगितली. पर्यटनदृष्टया महत्व सांगितले.

    मध्य प्रदेशातील भाजपाचे प्रभारी डॉ. विनय  सहस्त्रबुध्दे यांच्याच शब्दांत सांगायचे तर मागासलेपणाचा शिक्का पुसून बिमारुच्या बिरुदातून सुटका घडवून आणण्यासाठी चौहान सक्रीय अ ाहेत. व्यवसाय सुलभता (इज आ‘फ बिझनेस) दर्शविणाºया मानांकनात मध्यप्रदेशाने तेराव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर प्रगती केली. विविध उपाययोजना करून  येथील शेतीची उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे शेतकºयांची जादा भावाची मागणी होती. त्यामुळेच मंदसोरसारख्या ठिकाणी शेतकरी आंदोलने झाली होती.
    खरेम्हणजे मध्य प्रदेशात भाजपाचा पराभव हा एक धक्काच होता. प्रशासकीय पातळीवर चांगल्या पध्दतीने चालविलेले राज्य म्हणून मध्य प्रदेशचे नाव होते. निवडणूकपूर्व सार्व्हेनुसार चौहान हे राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. मात्र, येथे साधारण मुड असा होता की शिवराज से बैर नहीं, विधायकोंक खैर नहीं, असे जनता म्हणत होती. पण शिवराजसिंह चौहान यांनी पक्षीय पातळीवर शह-काटशहाचे राजकारण केले नाही. उगाच कोणाची तिकिटे कापली नाहीत. जोमाने प्रचार करत राहिले. त्यामुळे कॉँग्रेसला भाजपापेक्षा अर्धा टक्का कमी मते मिळूनही त्यांचे चार आमदार जास्त निवडून आले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मिनी लोकसभा म्हणून लढविलेली जात असलेली ही निवडणूक हरल्याने भाजपात मरगळ येणे शक्य होते. पण निवडणूक निकालानंतर दुसºया दिवसापासून शिवराजसिंह चौहान कामाला लागले. राज्यात प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला. यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याची रणनिती आखली.
    द्रला खात्री होती. सहस्त्रबुध्दे याबाबत एका मुलाखतीत म्हणाले होते की , स्वत:ला सामान्य जनांशी जोडण्याची शिवाराज सिंह यांची शैली असाधारण आहे. लोकानुरंजनापेक्षा लोकसंपर्क ही त्यांची खासियत राहिली आहे.
    २०१३ मध्ये गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदासाटी पुढे आले होते. त्यावेळी माध्यमांतील एका गटाने मोदी यांना विरोध म्हणून शिवराजसिंह चौहान यांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत येऊ शकते अशी चर्चा सुरू केली होती. मोदी आणि चौहान यांच्यात मतभेद असल्याच्या वावडड्याही उठविण्यात आल्या. मोदी आणि अमित शहा यांनीच मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केले असे म्हणण्यापर्यंतही काहींची मजल गेली होती. त्यामुळे मध्य प्रदेशात नुकत्याच झशलेल्या राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेण्यात येत होते. परंतु, भारतीय जनता पक्षाने अगदी एकमताने शिवराजसिंह चौहान यांचीच पुन्हा निवड करून त्यांच्या विकासाभिमुख राजकारणावरच पुन्हा एकदा विश्वास दाखविला आहे .

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!

    Sangram thopte संग्राम थोपटेंना काँग्रेसने दिले तोकडे बळ, पवारांनी नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!!