• Download App
    आदित्य ठाकरेंना देशव्यापी नेतृत्व करायला पाठवून महाराष्ट्रात कोणाचा मार्ग मोकळा करून घ्यायचा आहे??। Whose path is to be paved in Maharashtra by sending Aditya Thackeray to lead the country?

    आदित्य ठाकरेंना देशव्यापी नेतृत्व करायला पाठवून महाराष्ट्रात कोणाचा मार्ग मोकळा करून घ्यायचा आहे??

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशभर लोकसभेची निवडणूक शिवसेना लढवेल, अशी घोषणा शिवसेनेचे खासदार प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राजकीय वर्तुळामध्ये या मुद्यावरून वेगवेगळ्या कंगोऱ्यांनी चर्चा सुरू झाली आहे. Whose path is to be paved in Maharashtra by sending Aditya Thackeray to lead the country?

    आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व महाराष्ट्रात स्थिर होते आहे. पर्यावरण मंत्री म्हणून त्यांचे काम वादग्रस्ततेच्या पलिकडचे राहिले आहे. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर विविध आरोप होत असताना आदित्य ठाकरे यांचे काम ठळक दिसू लागले आहे. मध्यंतरी जिनिव्हा मध्ये अंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक परिषदेला उपस्थित राहून आदित्य ठाकरे यांनी छाप पाडली आहे.

    या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व महाराष्ट्रात स्थिरावत असताना त्यांना एकदम देशव्यापी पातळीवर नेतृत्व करण्याची संधी देऊन शिवसेना नेतृत्व काय साध्य करू इच्छित आहे?

    या निमित्ताने एक जुनी आठवण ताजी झाली. आदित्य ठाकरे यांच्याकडे युवा सेनेचे नेतृत्व देण्याची घोषणा स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या हाती एक तलवार दिली होती. ठाकरे घराण्याच्या आधीच्या तीन पिढ्यांना आशीर्वाद दिल्यात. आता चौथ्या पिढीला ही आशीर्वाद द्या असे भावनिक आवाहन त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी तमाम हिंदू जनतेला केले होते. बाळा साहेबांचे भाषण त्यावेळी फार गाजले होते. त्यानंतर युवासेनेची बांधणी टप्प्याटप्प्याने मजबूत होत गेली. आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर मान्य होत गेले.



    आज आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व एक वरिष्ठ कॅबिनेट मंत्री म्हणून महाराष्ट्रात स्थिरस्थावर होत आहेत. यावेळी अचानक आदित्य ठाकरे यांच्याकडे लोकसभेच्या निवडणुकीचे नेतृत्व सोपविण्याची घाई का करण्यात येत आहे?? शिवसेनेची देशव्यापी पातळीवर बांधणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांचे महाराष्ट्रातले राजकीय करिअर पणाला लावले जात आहे का…?? या सर्वांची उत्तरे “गूढ आणि गहन” आहेत.

    शिवाय युवा सेनेचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपविल्याची घोषणा जशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती, तशी लोकसभेची निवडणूक शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवेल, असे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी का नाही जाहीर केले?? ही घोषणा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या मुखातून का करण्यात आली…?? यामागचे नेमके राजकीय इंगित काय आहे??

    आदित्य ठाकरे यांना देशव्यापी नेतृत्वाचे “गाजर” दाखवून महाराष्ट्र नेमका कोणत्या नेतृत्वासाठी मार्ग मोकळा करून घ्यायचा आहे?? त्यांचे नेमके हेतू काय आहेत?? याविषयी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे यांना दिल्लीत पाठवून महाराष्ट्रात खासदार सुप्रिया सुळे यांचा मार्ग मोकळा करून घेण्यासाठी तर ही “राजकीय मशक्कत” सुरू नाही ना…?? या कळीच्या सवाला भोवती ही चर्चा सुरू झाली आहे…!!

    Whose path is to be paved in Maharashtra by sending Aditya Thackeray to lead the country?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!