• Download App
    Nawab Malik ED : ईडीच्या कार्यालयात धडक मारण्याचा शरद पवारांना "सल्ला" देणारे नवाब मलिक स्वतःच ईडीच्या जाळ्यात!! । Nawab Malik ED: Nawab Malik himself, who gave "advice" to Sharad Pawar to hit ED's office, is himself in ED's trap !!

    Nawab Malik ED : ईडीच्या कार्यालयात धडक मारण्याचा शरद पवारांना “सल्ला” देणारे नवाब मलिक स्वतःच ईडीच्या जाळ्यात!!

    नाशिक : 2019 मध्ये राज्य सहकारी शिखर बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या न आलेल्या नोटीस प्रकरणावरून त्यांना ईडीच्या कार्यालयात धडक मारण्याचा “सल्ला” देणारे नवाब मलिक हे स्वतःच आज ईडीच्या जाळ्यात आले आहेत. Nawab Malik ED: Nawab Malik himself, who gave “advice” to Sharad Pawar to hit ED’s office, is himself in ED’s trap!!

    नवाब मलिक यांनी काहीच दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये आपणच शरद पवारांना ईडीच्या कार्यालयात स्वतःहून चौकशीसाठी जाण्याचा सल्ला दिला होता, असा दावा केला होता. त्यानंतर राजकीय नाट्य घडले होते. शरद पवारांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाऊ नये, अशी विनंती महाराष्ट्र पोलिसांना करावी लागली होती. याची आठवण त्यावेळी नवाब मलिक यांनी जोरकसपणे सांगितली होती.

    आज तेच नवाब मलिक दाऊद इब्राहिमशी संबंध असणाऱ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. दाऊदचा भाऊ इक्‍बाल कासकर याने नवाब मलिक यांचे नाव घेतल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनीच नवाब मलिक यांच्या घरावर धडक मारली. नवाब मलिक हे ईडीच्या अधिकाऱ्यांबरोबर ईडीच्या कार्यालयात येऊन चौकशी आणि तपासाला सामोरे जाण्यास तयार झाले.



    हेच ते नवाब मलिक आहेत, की जे आपला जावई समीर खान ज्याच्याकडे सापडलेल्या गांजा च्या प्रकरणावरून रोज ईडीच्या अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे आरोपांच्या फैरी झाडत होते. त्यांना आज ईडीच्या अधिकाऱ्यांबरोबर चौकशीसाठी मुंबईच्या ईडी कार्यालयात येणे भाग पडले आहे.

    – पवारांवर आरोप

    राज्य सहकारी शिखर बँक प्रकरणात शरद पवार यांच्यावर 120 ब या कलमाखाली फसवणुकीचे आरोप आहेत. या प्रकरणात ईडीने प्रत्यक्षात त्यांना नोटीस पाठवली नव्हती. फक्त नोटीस पाठवल्याच्या बातम्या मराठी माध्यमांमध्ये आल्या होत्या. त्यावेळी शरद पवार यांनी आपण स्वतः ईडीच्या कार्यालयात चौकशीला सामोरे जाऊ, असे नुसते जाहीर केले होते. प्रत्यक्षात ते गेले नव्हते. मात्र या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे राजकारण उभे केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस जणू मुंबईची कोंडी करणार आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार, असे वातावरण तयार करण्यात आले होते.

    परंतु नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत आपणच शरद पवारांना ज्या कार्यालयात धडक मारण्याचा सल्ला दिला होता, असा दावा केला होता. आता मात्र शरद पवारांना लेडीज च्या कार्यालयात धडक मारण्याचा सल्ला देणारे नवाब मलिक हा स्वतःलाच ईडीच्या चौकशीच्या जाळ्यात आले आहेत.

    दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरने घेतले नवाब मालिकांचे नाव!!

    अंडरवर्ल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने नवाब मलिक यांचे नाव घेतल्यानंतर त्यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने ही चौकशी सुरू केल्याची माहिती आहे.

    ईडीने इक्बाल कासकर याला तीनच दिवसांपूर्वी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली होती. या चौकशीत त्याने ज्या राजकीय नेत्याचे नाव घेतले ते नवाब मलिक यांचे निघाले. त्यानंतर ईडीचे अधिकारी आज सकाळी 5.30 च्या सुमारास नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले. तेथे त्यांनी काही पाहणी केली

    नवाब मलिक यांनी ईडीच्या अधिकार्‍यांसमवेत ईडीच्या कार्यालयात येण्याचे मान्य केले आणि सुमारे 7.45 वाजता अधिकार्‍यांसमवेत नवाब मलिक ईडी कार्यालयात यायला निघाले. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू असून कोणत्या प्रकारे मनी लॉन्ड्रिंग झाले?, त्याचा काय वापर झाला? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

    2019 नंतर डिजिटलचे वॉलेट आणि डार्कनेटचा वापर करून मनी लॉन्ड्रिंग झाले. पैशाची अफरातफर करण्यात आली. हा पैसा मुंबईच्या रियल इस्टेटमध्ये गुंतविण्यात आला. याचा नवाब मलिक यांच्याशी संबंध आहे. या विषयीची तपशीलवार चौकशी ईडीचे अधिकारी करत आहेत. मुंबईतले दोन बडे बिल्डर देखील याबाबत ईडीच्या स्कॅनर खाली आहेत.

    केंद्रीय गृहमंत्रालयाने काही दिवसांपूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा छडा लावण्यासाठी काढलेल्या आदेशानुसार या चौकशा सुरू झाले आहेत. या चौकशांना वेग आला आहे त्यावेळी महाराष्ट्रातल्या बड्या राजकीय नेत्याचे दाऊदशी संबंधांविषयी चर्चा झाली होती. त्यापैकी नवाब मलिक हे एक नाव होते. ते आज ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. कारण त्यांचे नाव स्वतः इक्बाल कास कासकरने घेतल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

    Nawab Malik ED : Nawab Malik himself, who gave “advice” to Sharad Pawar to hit ED’s office, is himself in ED’s trap !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!