• Download App
    Congress leader Jitu Patwari's absurd statement : नेत्याच्या बेताल वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा अडचणीत..

    Congress leader Jitu Patwari’s absurd statement : नेत्याच्या बेताल वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा अडचणीत..

    Jitu Patwari

     

    विशेष प्रतिनिधी

    इंदुर:  Congress leader Jitu Patwari’s absurd statement :मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याने काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. एका सार्वजनिक सभेत भाजप सरकारवर टीका करताना पटवारी यांनी काही आक्षेपार्ह विधाने केली, ज्यामुळे सत्ताधारी भाजपाला काँग्रेसवर हल्ला चढवण्याची संधी मिळाली आहे. Congress leader Jitu Patwari’s absurd statement 

    पटवारी यांनी आपल्या भाषणात म्हटले, “बेरोजगारी, वाढते मद्यपान आणि मध्यप्रदेशातील अमली पदार्थांचा प्रसार याला भाजप सरकार जबाबदार आहे. जर तुमचा मुलगा बेरोजगार असेल आणि दारू पिऊन घरी येत असेल, तर मी शंभर टक्के सांगतो, ही भाजपची देण आहे. शिवराज सिंह चौहान आणि मोहन यादव यांनी मध्यप्रदेशाला अमली पदार्थ आणि नशेच्या आहारी ढकलले आहे.”

    याच भाषणात त्यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले, “भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत मध्यप्रदेशातील महिला सर्वाधिक मद्यपान करतात. भाजपाने ‘लाडकी बहिणी’सारख्या योजनांच्या नावावर मते मागितली, पण महिलांना अमली पदार्थांपासून वाचवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. आज मध्यप्रदेश सर्वाधिक मद्यपान करणाऱ्या महिलांचे राज्य बनले आहे.”

    भाजपाचा पलटवार
    या विधानांमुळे जितू पटवारी आणि काँग्रेस पक्ष टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. भाजपाने यावर तीव्र आक्षेप घेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी या टीकेला ‘अशोभनीय’ संबोधले, तर मध्यप्रदेश भाजपच्या प्रवक्त्या नेहा बग्गा यांनी हे विधान महिलांचा अपमान करणारे असल्याचे म्हटले. त्या म्हणाल्या, “काँग्रेसची मानसिकता व्यसनाधीन आहे. हे वक्तव्य म्हणजे महिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.”



    काँग्रेसच्या अडचणी वाढल्या
    पटवारी यांनी बेरोजगारी आणि अमली पदार्थांचा प्रसार यासारखे गंभीर मुद्दे उपस्थित केले असले, तरी त्यांच्या महिला-संदर्भातील विधानाने काँग्रेसला प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे. मध्यप्रदेशात काँग्रेस सध्या आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असताना, नेत्यांकडून अशी बेजबाबदार वक्तव्ये पक्षाच्या अडचणी आणखी वाढवत आहेत.

    पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार?
    सध्या मध्य प्रदेशात काँग्रेस आपल्या अस्तित्वात साठी जगत असताना नेत्यांकडून अशी बेजबाबदार वक्तव्य केल्यामुळे पक्षाची अडचण अजूनच वाढू शकते. आता काँग्रेस पक्षश्रेष्ठी या प्रकरणाकडे कसे पाहतात आणि जितू पटवारी यांच्या वक्तव्यावर काय कारवाई करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मध्यप्रदेशातील राजकीय वातावरणात या वादाने नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

     

    Congress is in trouble again due to the leader’s absurd statement.

     

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Atharva Sudame : सुदामेंना वाढता पाठिंबा; समाजमाध्यमांवर अनेकांनी व्यक्त केल्या भावना

    अबकारी धोरण प्रकरणः न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत केली वाढ.

    पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला समर्पित केल्या ७ नवीन संरक्षण कंपन्या, म्हणाले- ‘१५ -२० वर्षांपासून प्रलंबित होते हे काम!’