विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : व्हाईट कॉलर पांढरपेशी जिहादी समाजमाध्यमात चिथावणीखोर बातम्या पसरवून युवकांमध्ये भारतविरोेधी द्वेषभावना निर्माण करून जातीय संघर्ष निर्माण करू शकतात, असा इशारा जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबागसिंग यांनी दिला आहे.White-collar jihadists could create communal conflict, the possibility was expressed by the Director General of Police of Jammu and Kashmir
सायबर दहशतवादी प्रत्यक्ष दहशतवाद्यांपेक्षा घातक असतात; कारण तो लपून बसलेला असतो आणि पूर्णपणे अज्ञात असतो, असेही त्यांनी सांगितले.दिलबागसिंग म्हणाले, हे युद्ध नवीन असून, यात पारंपरिक शस्त्रास्त्रे, अरुंद रस्ते व जंगलातील युद्धाचे क्षेत्र संगणक व स्मार्टफोनमध्ये परिवर्तित झाले आहे.
अलिकडेच जम्मू-काश्मीर पोलिसांनी पाच संशयित जिहादींना अटक केली. त्यांच्यावर देशाच्या सार्वभौमत्वाबद्दल खोट्या बातम्या पसरविण्याचा आरोप होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी पांढरपेशी जिहादींकडे सरकारी अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वकील व राजकीय कार्यकर्त्यांची काळी यादी तयार करण्याचे काम देण्यात आले होते.
White-collar jihadists could create communal conflict, the possibility was expressed by the Director General of Police of Jammu and Kashmir
महत्त्वाच्या बातम्या
- सचिन वाझेला भीती कोठडीतील मृत्यूची, फादर स्टॅन स्वामीप्रमाणे मृत्यू येऊ नये म्हणून मागितले तातडीचे उपचार
- जन-धन योजनेत खातेधारकांना मोफत अपघाती विमा
- पाचवी ते दहावीपर्यंत सर्व शाळांमध्ये आता मराठी विषय सक्तीचा ; राज्य सरकारचा नवा जीआर जारी
- तुझ्या कामगिरीचा सार्थ अभिमान; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सुमित अँटीलवर कौतुकाचा वर्षाव