• Download App
    कोरोना काळातही देशाच्या परकीय चलनसाठ्यात मोठी वाढ, ६१० अब्ज रुपयांची गंगाजळी|Even during the Corona period, the country's foreign exchange reserves rose sharply to Rs 610 billion

    कोरोना काळातही देशाच्या परकीय चलनसाठ्यात मोठी वाढ, ६१० अब्ज रुपयांची गंगाजळी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोना काळात मोदी सरकारने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे देशाची अर्थव्यवस्था सावरू लागलीआहे. केंद्र सरकारच्या तिजोरीत कराच्या माध्यमातून येणारा उत्पन्नाचा स्रोत आटला असला तरी देशाकडील परकीय चलनाच्या साठ्यामध्ये वाढ झाली आहे.Even during the Corona period, the country’s foreign exchange reserves rose sharply to Rs 610 billion

    २ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलनाचा साठा १.०१३ अब्ज रुपयांनी वाढून ६१०.०१२ अब्ज डॉलरच्या रेकॉर्ड पातळीवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आज ही आकडेवारी प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे.



    आरबीआयने दिलेल्या आकडेवारीनुसार २५ जून रोज समाप्त झालेल्या याआधीच्या आठवड्यामध्ये देशातील परकीय चलनाचा साठा ५.०६६ अब्ज डॉलर एवढा वाढून ६०८.९९९ अब्ज डॉलर एवढा झाला होता. १८ जूनला संपलेल्या आठवड्यात परकीय चलनाच्या साठ्यामध्ये ४ हजार ४१८ अब्ज डॉलरने घट होऊन तो ६०३.९३३ अब्ज डॉलर एवढा झाला होता.

    तत्पूर्वी ११ जून रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये परकीय चलनाचा साठा ३ हजार ०७४ अब्ज डॉलरने वाढून ६०८.०८१ अब्ज डॉलर या स्तरावर पोहोचला होता.परकीय चलनाच्या साठ्यामध्ये वाढ होण्याचे कारण परकीय चलन संपत्ती म्हणजेच एफसीएमध्ये झालेली वाढ हे आहे.

    यादरम्यान, एफसीए ७४.८ कोटी डॉलरच्या वाढीसह ५६६.९८८ अब्ज डॉलर एवढा झाला आङे. डॉलरच्या तुलनेत सांगण्यात येणाऱ्या परकीय चलनाच्या संपत्तीमध्ये युरो, पौंड्स आणि येन यासारख्या अन्य परकीय चलनांच्या किमतीत झालेल्या घटीचा प्रभावही समाविष्ट आहे.दरम्यान, आकडेवारीनुसार देशाकडील सोन्याच्या साठ्यामध्ये ७.६ कोटी डॉलरने वाढ होऊन ते ३६.३७२ अब्ज डॉलर एवढे झाले आहे.

    तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे उपलब्ध असलेल्या एसडीआर मध्ये ४.९ कोटी डॉलरने वाढ होऊन ते १.५४८ अब्ज डॉलर झाला आहे. यादरम्यान आयएमएफकडे असलेला भारताचा परकीय चलनाचा साठा १३.९ कोटी डॉलरनी वाढून ५.१०५ अब्ज डॉलर एवढा झाला आहे.

    Even during the Corona period, the country’s foreign exchange reserves rose sharply to Rs 610 billion

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य