Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मुलगा झीशानचा सवाल- पोलिस मास्टरमाइंडला का पकडत नाहीत, अनमोल बिष्णोईला घाबरता का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या तपासावरून त्यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांनी मुंबई पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुख्यात गुंड अनमोल बिष्णोईची चौकशी करण्यात पोलिस टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत झिशान सिद्दीकी यांनी थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.