ZP Election : ZP निवडणुकीपूर्वी सरकारचा मोठा निर्णय; उमेदवारी अर्जावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय राहणार अंतिम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या अधिनियम, 1961 च्या कलम 14 (2) मध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे जिल्हा परिषद, पंचायती समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जाशी संबंधित मुद्यांवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. त्याचा मोठा लाभ सत्ताधाऱ्यांना मिळण्याचा दावा केला जात आहे.