Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण पूर्णपणे शांत झालेले नाही आणि आता त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यास पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. धमकी पाठवणाऱ्यांनी झीशान सिद्दीकीकडून १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. सध्या वांद्रे पोलिसांचे एक पथक झीशान सिद्दीकीच्या घरी पोहोचले आहे आणि त्याचा जबाब नोंदवत आहे.