Yugendra Pawar : अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवारही अडकणार विवाहबंधनात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली असून, युगेंद्र आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी तनिष्का प्रभू यांचा एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे.