Yogi government : योगी सरकार ‘सपा’ खासदाराशी लग्न करणाऱ्या क्रिकेटपटू रिंकू सिंगला देणार सरकारी नोकरी
समाजवादी पार्टीच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी लग्न करणाऱ्या क्रिकेटपटू रिंकू सिंगला उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने सरकारी नोकरी देण्याची तयारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेश सरकार क्रिकेटपटू रिंकू सिंगला शिक्षण विभागात नोकरी देणार आहे. रिंकू सिंग यास जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी (बीएसए) म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.