Yogi Adityanath : ‘कावड यात्रा मार्गावर दुकानदाराचे नाव स्पष्टपणे लिहिले पाहिजे’
कावड यात्रापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कडक निर्णय घेतला आहे. त्यांनी यात्रेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आणि भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर करण्याची गरज यावर भर दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की यात्रा मार्गावर मांसाची खुलेआम विक्री होऊ नये आणि दुकानदारांनी त्यांच्या प्रतिष्ठानांवर त्यांची खरी नावे लिहावीत.