Yogesh Kshirsagar : बीडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का, योगेश क्षीरसागरांचा सपत्नीक भाजपमध्ये प्रवेश
नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बीडमध्ये मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांची साथ सोडून थेट भाजपचा हात धरला आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. आता योगेश क्षीरसागर हे भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावरून बीड नगरपालिका निवडणूक लढवणार आहेत.