Yogesh Kadam : पोलिसांवर हात उगारणाऱ्यांना पोलिसी धाक दाखवणार; गृहराज्य मंत्री योगेश कदमांचा इशारा
नागपूर हिंसाचारात पोलिसांवर हात उगारणाऱ्या दंगलखोरांना पोलिसांचा धाक काय असतो हे दाखवून देऊ, असा इशारा राज्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी बुधवारी विधिमंडळ परिसरात बोलताना दिला. यावेळी त्यांनी जनतेला सोशल मीडियावर हिंसाचाराचे व्हिडिओ व्हायरल न करण्याचेही आवाहन केले.