Cold Allergy : सर्दी आणि अॅलर्जीच्या औषधांचे नमुने फेल, विक्रीवर बंदी; YL फार्माच्या लेव्होसेटीरिझिन-डायहायड्रोक्लोराइड टॅब्लेटचा दर्जा आढळला निकृष्ट
जयपूरमधील एका औषध कंपनीत सर्दी आणि अॅलर्जीचे निकृष्ट दर्जाचे औषध तयार करताना आढळून आले आणि या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. औषध नियंत्रण विभागाने शुक्रवारी एक अहवाल प्रसिद्ध केला. ज्यामध्ये YL फार्माचे सर्दी आणि अॅलर्जीचे औषध निकृष्ट दर्जाचे असल्याचे घोषित करण्यात आले. विभागाने कंपनीकडून इतर औषधांचे नमुने मागवले आहेत आणि त्यांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.