Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपन्यांवरील ईडीची कारवाई पूर्ण; 3 दिवसांत 35 ठिकाणी छापे; 3000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) छापे रविवारी पूर्ण झाले. ही कारवाई २४ जुलै रोजी सुरू झाली आणि तीन दिवस चालली. या छाप्यात सुमारे ५० कंपन्या सहभागी आहेत. २५ हून अधिक लोकांची चौकशीही करण्यात आली आहे.