महिलांच्या आत्मरक्षणासाठी यवतमाळ पोलिसांचा पुढाकार; तब्बल 6000 हजार विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण
राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच महाराष्ट्रातले पोलीस वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेत असतात. त्यामध्ये ते प्रामुख्याने महिला, मुले यांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देत असतात. महिलांच्या आत्मरक्षणासाठी पोलिसांनी पुढाकार घेतल्याचे उदाहरण यवतमाळ मधून समोर आले. महिलांनी अत्याचाराच्या विरोधात आत्मविश्वासाने उभे राहावे. आत्मरक्षण करावे यासाठी पोलिसांनी तब्बल 6000 विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण दिले.