बिहार मधल्या मोठ्या पराभवानंतर तेजस्वीला कार्याध्यक्ष पदाची “बक्षीसी”; यादव कुटुंबातली फूट जास्त रुंदावली!!
निवडणुकीत कितीही मोठा पराभव होऊ द्या, सगळे कुटुंब तुटू द्या, तरी आम्ही नाहीच सुधारणार, याचा प्रत्यय आज देशाला आला. देशातल्या एका मोठ्या प्रादेशिक पक्षाने आज आपला कार्यकारी अध्यक्ष नेमला. लालूप्रसाद यादव यांनी तेजस्वी यादव यांना राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकारी अध्यक्ष केले. पण तेजस्वी यादव यांना कार्यकारी अध्यक्ष पदाची बक्षीसी दिल्यानंतर यादव कुटुंबातली फूट जास्त रुंदावली.