mohan bhagwat : सरसंघचालक म्हणाले- आजचा इतिहास पाश्चिमात्य दृष्टिकोनातून लिहिला गेलाय; त्या पुस्तकांत चीन-जपान सापडेल, भारत नाही; लोकांना तिसऱ्या महायुद्धाची भीती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी अभ्यासक्रमातील बदलाचे समर्थन केले. ते म्हणाले की, भारताला समजून घेण्याची आणि योग्य पद्धतीने सादर करण्याची गरज आहे. भागवत म्हणाले- आज शिकवला जाणारा इतिहास पाश्चिमात्य दृष्टिकोनातून लिहिला गेला आहे. भारताचे अस्तित्व त्यांच्या विचारांमध्ये नाही. भारत जगाच्या नकाशावर दिसतो, पण त्यांच्या विचारांमध्ये नाही. चीन आणि जपान त्यांच्या पुस्तकांमध्ये सापडतील, भारत नाही.