Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले- जग झुकते, झुकवणारा पाहिजे; विश्वगुरू व्हायचे असल्यास आयात कमी आणि निर्यात वाढवावी लागेल
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत की, सध्या देशात ज्या विषयांवर चर्चा होत आहे त्यांचे नाव मी घेऊ इच्छित नाही. जगात आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, परंतु जग झुकते, फक्त झुकवणारा पाहिजे असे माझे मत आहे. शनिवारी नागपूरमधील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (VNIT) एका कार्यक्रमात गडकरी उपस्थित होते.