Shivaji Maharaj Forts : शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत; रायगड, शिवनेरीसह महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा समावेश
महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद अशी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांसह तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.