World Bank : जागतिक बँकेच्या सहाय्याने नवे जलसंपत्ती प्रकल्प
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘मित्र (महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) प्रशासकीय परिषदे’ची दुसरी बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण व नवीन साठवण तलाव बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.