कामगारांसाठी 4 नवीन कायदे लागू; “असे” झाले बदल, “या” मिळणार सुविधा!!
वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२०, आणि ऑक्युपेशनल सुरक्षितता, आरोग्य आणि वर्किंग कंडीशन्स संहिता २०२० हे नवीन कायदे कामगारांच्या हिताचं रक्षण करुन त्यांच्याविषयीचा आदर वाढवतील. जुन्या कायद्यांमधल्या तरतुदी कालबाह्य झाल्या असून, नवीन कायद्यांमुळे कामगारांना सरस वेतन, विमा सुरक्षा आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल, असे केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केले.