Chhattisgarh :छत्तीसगडच्या स्टील प्लांटमध्ये स्फोट, 6 ठार; 5 गंभीर, तप्त लोखंड मजुरांवर पडले, दूरपर्यंत धुराचे लोट दिसले
छत्तीसगडमधील बलौदाबाजार जिल्ह्यातील बकुलाही परिसरात असलेल्या स्पंज आयर्न प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 5 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक दबले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक तपासणीत असे समोर आले आहे की, प्लांटमधील स्फोट तांत्रिक बिघाड किंवा दाबामुळे झाला आहे. सध्या पथक तपास करत आहे.