Japan PM : जपानच्या नव्या पंतप्रधान 18 तास काम करतात; पहाटे 3 वाजता बोलावली बैठक
जपानच्या नवीन पंतप्रधान साने ताकाइची यांनी पहाटे ३ वाजता बैठक बोलावल्यानंतर जपानमध्ये काम आणि जीवनातील संतुलनावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच ताकाइची या त्यांच्या “काम, काम, काम आणि फक्त काम” या वृत्तीमुळे चर्चेत आहेत. त्यांनी तर असे म्हटले आहे की, त्या १८ तास काम करतात आणि काम आणि जीवनातील संतुलनावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना लोकांनी “घोड्यांसारखे काम करावे” असे वाटते.