Womens Day : महिला दिनानिमित्त भारतीय रेल्वेचा ऐतिहासिक उपक्रम
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, भारतीय रेल्वेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आणि पहिल्यांदाच, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची जबाबदारी पूर्णपणे महिलांवर सोपवली. या ट्रेनमध्ये, लोको पायलटपासून ते केटरिंगपर्यंत सर्व जबाबदारी महिलांनी घेतली.