Shashi Tharoor : राहुल यांच्या खासदारांसोबतच्या बैठकीला थरूर अनुपस्थित; सलग तिसऱ्यांदा काँग्रेसच्या बैठकीला गैरहजर
काँग्रेस खासदार शशी थरूर शुक्रवारी संसद भवनाच्या ॲनेक्स एक्सटेन्शन बिल्डिंगमध्ये काँग्रेस खासदारांच्या महत्त्वाच्या बैठकीला पुन्हा अनुपस्थित राहिले. ही बैठक विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यात ९९ खासदार सहभागी झाले होते. बैठकीत हिवाळी अधिवेशनादरम्यान आतापर्यंत पक्षाच्या खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.