West Bengal Voter List : बंगालमध्ये SIRची मसुदा मतदार यादी जाहीर; 58.20 लाख मतदारांची नावे वगळली
निवडणूक आयोगाने मंगळवारी पश्चिम बंगालच्या SIR ची मसुदा मतदार यादी जारी केली आहे. राज्यात 58 लाख 20 हजार 898 मतदारांची नावे वगळण्यासाठी चिन्हांकित करण्यात आली आहेत. यापैकी 24 लाख 16 हजार 852 नावे मृत मतदारांची आहेत. 19 लाख 88 हजार 76 मतदार असे आहेत जे कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत.