TN & Assam : 4 निवडणूक राज्यांत महिलांना 24 हजार कोटींचे वाटप; तामिळनाडूत समर पॅकेज, आसाममध्ये बिहू बोनस
देशातील चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना थेट रोख रक्कम देण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या चार राज्यांमध्ये मिळून तब्बल २४,५०० कोटी रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत. सत्तेत आल्यास पुढील पाच वर्षेही अशीच आर्थिक मदत सुरू ठेवली जाईल, असे आश्वासनही दिले जात आहे.