Nipah virus : बंगालमध्ये दोन नर्समध्ये निपाह विषाणूची लक्षणे, प्रकृती गंभीर, केंद्राने तज्ञांचे पथक पाठवले
पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचे दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. न्यूज एजन्सी पीटीआयने बंगाल आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारासात येथील एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या दोन परिचारिकांमध्ये निपाह विषाणूची लक्षणे आढळली आहेत.