Iran Hijab : इराणमध्ये हिजाब लादणाऱ्याच्या मुलीने स्लिव्हलेस ड्रेस घातला; जनतेत संतापाची लाट
इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे सल्लागार अली शामखानी यांची मुलगी फातिमा हिच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या वर्षी तेहरानमधील आलिशान एस्पिनास पॅलेस हॉटेलमध्ये हा विवाह पार पडला होता.